रात्रपाळीला बोलावण्यापूर्वी घ्यावी लागणार कर्मचाऱ्याची परवानगी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jul-2019
Total Views |


 


केंद्र सरकार महिलांसाठी नवा नियम लागू करणार


नवी दिल्ली : कर्मचाऱ्यांची सुरक्षा, आरोग्य आणि कार्यस्थिती संहिता विधेयक २०१९ लागू केले जाणार आहे. त्यानुसार, महिलांना रात्रपाळीला कामावर ठेवण्यापूर्वी त्यांची परवानगी आवश्यक असणार आहे. कार्यालयीन महिला कर्मचाऱ्यांना सुरक्षा, कामाचे तास आणि अन्य अटीही ठेवण्यात आल्या आहेत. प्रामुख्याने सकाळी सहापूर्वी आणि सायंकाळी सातनंतर महिला कर्मचाऱ्याची ड्युटी लावण्यापूर्वी त्यांची परवानगी आवश्यक असणार आहे.

 

महिलांना रात्रपाळीसाठी बोलावताना कार्यालयात अनुकूल वातावरण असावे, त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात यावी, अशाप्रकारे लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्याचे काम कंपनीतर्फे करण्यात यावे, अशी अट कंपन्यांपुढे ठेवण्यात येणार आहे. लोकसभेत पारित केलेल्या या विधेयकावर नोकरी करणाऱ्या महिला सुरक्षेबद्दल विशेष तरतूदी करण्यात आल्या आहेत.

 

विधेयकातील महत्वाच्या तरतूदी

या विधेयकानुसार, विविध क्षेत्रातील आवश्यकतेनुसार, नियामावली अद्यावत केली जाऊ शकते. तंत्रज्ञानातील बदलानुसार, कायद्यातील प्रक्रीया गतिमान करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे नोकरीच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आता अधिकृतरित्या तक्रार केली जाऊ शकणार आहे.

 

एकाच ठिकाणी करता येणार तक्रार

तक्रार नोंदणीची सोय एकाच ठिकाणी करण्याचा प्रस्ताव यात मांडण्यात आला आहे. यापूर्वी १३ श्रम कायद्यांपैकी ६ कायद्यांमध्ये विविध ठिकाणी तक्रार करण्याची प्रक्रीया आहे. हे टाळण्यासाठी एककेंद्रीकृत माहीती संकलित करण्यात येईल. सद्यस्थितीत तक्रार करायची झाल्यास सहा कायद्यांतर्गत वेगवेगळी नोंद घ्यावी लागते.

 

कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी आवश्यक

मालकाला विशिष्ट वयावरील कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करणे आवश्यक असणार आहे. याद्वारे कर्मचाऱ्यांचे आरोग्यही स्थिर राहील आणि उत्पादन क्षमताही वाढेल. कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा देण्याची तरतूदही यात करण्यात आली आहे.

 

कर्मचाऱ्यांचे शोषण रोखणार

कर्मचाऱ्यांचे शोषण रोखण्यासाठी केंद्र सरकारतर्फे नव्या नियमावलीनुसार, कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रात नमूद केल्यापेक्षा जास्त काम त्याच्या इच्छेविरोधात देता येणार नाही.

 

कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी राष्ट्रीय सुरक्षा मंडळ

पाच श्रमिक कायद्यांनुसार, अंतर्गत समित्यांसाठी राष्ट्रीय सुरक्षा मंडळाचीही स्थापना करण्यात येणार आहे. त्यात कर्मचारी संघटना प्रतिनिधी, राज्य सरकारचा प्रतिनिधी आणि नियुक्त करणाऱ्या कंपनीती एक प्रतिनिधी आदींचा सामावेश असेल.

 

दुर्घटना घडल्यास नुकसानभरपाई

काम करताना कर्मचारी मृत किंवा गंभीर जखमी झाल्यास त्याला नुकसानभरपाई न्यायालयाच्या निर्देशानुसार द्यावी लागेल, त्यामुळे त्याच्या कुटूंबियाला आर्थिक मदत मिळण्यास मदत होईल. सद्यस्थितीत कर्मचाऱ्यांना लागू होणाऱ्या नियमावलींसाठी विविध कायदे आहेत. प्रस्तावित विधेयकानंतर एक कायदा लागू केला जाईल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@