जर पाकिस्तानसोबत चर्चा झाली तर फक्त काश्मीर नाही तर पाकव्याप्त काश्मीर प्रश्नावर होईल : राजनाथ सिंह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jul-2019
Total Views |


 

काश्मीर आमच्या राष्ट्रीय स्वाभिमानाचा प्रश्न असल्याने मध्यस्थता स्वीकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र यांची काश्मीर प्रश्नावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी कोणतीच चर्चा झाली नसल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले आहे. तसेच जर पाकिस्तानसोबत चर्चा झाली तर फक्त काश्मीर नाही तर पाक अधिकृत काश्मीर प्रश्नावर होईल, ठामपणे त्यांनी सांगितले.

 
 
 
 
 

लोकसभेत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यानंतर आज बुधवारी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीच्या वृत्तावर उत्तर देत याचे खंडन केले आहे. परराष्ट्र मंत्र्यांनी दिलेली माहिती अत्यंत योग्य असल्याचे सांगत राजनाथ सिंह पुढे म्हणाले की, काश्मीर प्रश्नावर मध्यस्थता स्वीकारण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. काश्मीर आमच्या राष्ट्रीय स्वाभिमानाचा प्रश्न असल्याने मध्यस्थता स्वीकारुच शकत नाही. उद्या जर पाकिस्तानसोबत चर्चा झालीच तर ती पाक अधिकृत जम्मू काश्मीवरही होईल असे त्यांनी ठामपणे सांगितले.

 
 
 
 
 
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat 
@@AUTHORINFO_V1@@