२६ जुलैला 'उरी' चित्रपट मोफत दाखवण्याचे राज्य सरकारचे आदेश

    24-Jul-2019
Total Views |

 

 

मुंबई : १ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेला विकी कौशल याचा 'उरी द सर्जिकल स्ट्राईक' हा सिनेमा पुन्हा एकदा २६ जुलै ला कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने प्रदर्शित करण्यात येणार आहे. परंतु हा चित्रपट संपूर्ण देशात नव्हे तर महाराष्ट्रातील ४५० थिएटर मध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी याबाबत माहिती दिली. महाराष्ट्रात या चित्रपटाचा एक शो म्हणजेच २६ जुलै रोजी मोफत दाखवण्याचे आदेश माजी सैनिक कल्याणमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सर्व जिल्ह्याधिकार्यांना दिले. २६ जुलै रोजी सकाळी दहा वाजता हा चित्रपट राज्यातील ४५० चित्रपटगृहात मोफत दाखवण्यात येणार आहे. उरी मोफत दाखवण्याबाबतचे आवाहन राज्यातील सर्व चित्रपटाचे वितरक, सिनेमागृहाचे मालक व चित्रपट संघटनांना करण्यात आले आहे.


 



 

हा चित्रपट १६ डिसेंबर २०१६ ला काश्मीर मधील उरी इथे भारतीय जवानांवर झालेल्या हल्ल्याची सत्यकहाणी सांगणारा आहे. या हल्ल्यात भारताचे १८ सैनिक शहीद झाले होते. तसेच भारतीय सैन्यांनी केलेल्या हल्ल्यात १४ दहशतवादी देखील मारले गेले होते. या चित्रपटात विकी कौशल याने प्रमुख भूमिका निभावली असून याचे दिग्दर्शक आदित्य थर हे आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी हा ब्लॉकबस्टरवर हिट होईल याचा अंदाज नव्हता. परंतु चित्रपट फक्त हिटच ठरला नाही तर याने बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाईपण केली. या चित्रपटाने जवळपास ३०० करोड रुपयांची कमाई केली.


 
 
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat