मुंबई: ‘टिक-टॉक' या मोबाईल अँपवर भारतात मजकूर नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून वारंवार टीका करण्यात आली. सोशल मीडियावर तरुण तरुणींमध्ये फेमस असणाऱ्या या अँपवरून २८ जुलैनंतरचे तब्बल ६० लाख आक्षेपार्ह व्हिडिओ डिलिट केल्याचे ‘टिक-टॉक इंडियाच्या सेल्स एन्ड पार्टनरशीप’ विभागाचे संचालक सचिन शर्मा यांनी सांगितले. याचे कारणही तसेच आहे या अँपवरील काही वापरकर्ते जास्तीत जास्त लाईक व शेअर मिळवण्याच्या नादात अश्लिल, धार्मिक तेढ निर्माण होईल असे व्हिडीओ बनविले जात होते. तसेच काही मजकूर लहान मुलांच्या मनावर विपरीत परिणाम करणारा असाही होता. हा मजकूर भारतीय मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करणारा असल्याने असे व्हिडीओ डिलिट करण्यात आले आहेत, असेही शर्मा यांनी सांगितले.
भारतात ‘टिक-टॉक'चे २० कोटी वापरकर्ते आहेत. भारतातील मुख्य १० भाषांमध्ये हे अँप उपलब्ध आहे. यापुढे यावर येणाऱ्या प्रत्येक मजकुरावर लक्ष ठेवले जाणार असून आक्षेपार्ह व्हिडीओ वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्याच्या आधीच त्वरित डिलिट करण्यात येतील. या अँपच्या माध्यमातून सकारात्मक व्हिडिओच यापुढे रिलीज केले जातील याची काळजी घेतली जाणार असल्याचेही शर्मा यांनी सांगितले.