हो, पाकमध्ये ४० दहशतवादी संघटना ; इम्रान खानची कबुली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jul-2019
Total Views |



नवी दिल्ली : अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी अखेर पाकिस्तानवर होत असलेले आरोप काही अंशी मान्य केले. पाकिस्तान ४० विविध दहशतवादी संघटना सक्रिय होत्या हे इम्रान खान यांनी कबूल केले आहे. 'पाकिस्तानवर नेहमीच दहशतवादाला खतपाणी घालण्याचा, दहशतवादी संघटनांना आश्रय देण्याचा आरोप होतो.

 

इम्रान खान यांनी पुढे सांगितले की, "पाकिस्तानातील सरकारांनी खासकरुन मागच्या १५ वर्षात सत्तेवर आलेल्या सत्ताधाऱ्यांनी अमेरिकेला सत्य कधीच सांगितले नाही. पाकिस्तान ४० विविध दहशतवादी संघटना सक्रिय होत्या. आम्ही दहशतवादाविरुद्ध लढाई लढत आहोत. ९/११ शी आमचे काही देणेघेणे नाही. अल कायदा अफगाणिस्तानात होती. पाकिस्तानात तालिबानचे दहशतवादी नव्हते. पण आम्ही अमेरिकेच्या लढाईत सहभागी झालो. दुर्देवाने जेव्हा काही गोष्टी चुकीच्या घडल्या तेव्हा मी माझ्या सरकारला दोष दिला. आम्ही जमिनीवरील खरी सत्य परिस्थिती अमेरिकेला सांगितली नाही."

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@