पुणे-सातारा अपघात ; ३ तरुणांचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jul-2019
Total Views |



पुणे : मंगळवारची सकाळ पुण्यातील तळजाई टेकडी परिसरातील कुटुंबांसाठी कर्दनकाळ ठरली. पुणे सातारा रस्त्यावर सोमवारी रात्री भीषण अपघात झाला. कोंढणपुरजवळ ट्रक आणि तीन दुचाकींच्या धडक झाल्याने अपघात झाला. या अपघातात पुण्यातील तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे तर पाच तरुण जखमी झाले आहेत. मंगळवारी मध्यरात्री हा अपघात झाला. हे सर्व तरुण पुण्यातील तळजाई टेकडी परिसरामध्ये राहणारे आहेत.

 

सोमवारी सुशील कांबळे या तरुणाचा वाढदिवस होता. रात्री पार्टी केल्यानंतर हे तरुण रात्री१२.३० वाजता कोंढणपुर जवळ असलेल्या दर्ग्याचे दर्शन घेण्यासाठी निघाले. मात्र कोंढणपुरजवळ या तीनही दुचाकी ट्रकला धडकल्या. यातील जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये अनिकेत रणदिवे, सुशील कांबळे, सुरेश शिंदे यांचा समावेश आहे. तर करण जाधव, राकेश कुऱ्हाडे, अमर कांबळे, चेतन लोखंडे अशी जखमी तरुणांची नावे आहेत. जखमींना ससेवाडीमधील श्लोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@