'नो बॉल'वर नजर ठेवायला आयसीसीची नवी शक्कल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jul-2019
Total Views |



नवी दिल्ली : पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा फटका सामन्यामध्ये बसू नये यासाठी आयसीसीने नवीन शक्कल लढवली आहे. नो बॉलवरून होणारे वाद लक्षात घेता आता आयसीसीने नवे तंत्रज्ञान अवलंबण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत. अनेकदा गोलंदाजाने टाकलेला नो बॉल पंचांच्या नजरेतून सुटतो आणि फलंदाजाला बाद दिले जाते. रिप्लेमध्ये नो बॉल असल्याचे लक्षात येते आणि मग खेळाडू पंचांशी हुज्जत घालतात. या बाबी लक्षात घेता आयसीसीने 'नो बॉल तंत्रज्ञाना'ला मंजुरी दिली आहे. भारतातील क्रिकेट सामन्यांमध्ये या तंत्रज्ञानाचा पहिल्यांदा वापर करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानाचा वापर केला जावा अशी बीसीसीआयने मागणी केली होती.

 

काय आहे 'नो बॉल तंत्रज्ञान'?

 

नो बॉल तंत्रज्ञानाद्वारे गोलंदाजाच्या पायावर नजर ठेवली जाणार आहे. गोलंदाज क्रिजवर पाय ठेवतो त्यावेळी तिसरा पंच त्यावर कॅमेऱ्याच्या मदतीने नजर ठेवणार आहे. गोलंदाजाचा पाय क्रिजच्या पुढे असेल तर तिसरा पंच लगेच मैदानावरील पंचाना माहिती देईल. आतापर्यंत तिसरा पंच डीआरएसची मागणी झाल्यानंतर गोलंदाजाच्या पायावर लक्ष ठेवत होता. मात्र, या तंत्रज्ञानामुळे तिसरा पंच थेट मैदानावरील पंचांनाच नो बॉलसंदर्भात माहिती देणार आहे. हे नो बॉल तंत्रज्ञान खर्चिक आहे. एका सामन्यात त्याचा वापर केल्यास हजारो डॉलरचा खर्च येणार आहे. बीसीसीआयने केलेल्या मागणीमुळे आयसीसीने प्रायोगिक तत्वावर या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची तयारी दर्शवली आहे. लवकरच भारतात होणाऱ्या सामन्यांमध्ये हे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@