कर 'नाटक'चा अखेरचा अंक संपला : कुमारस्वामी सरकार कोसळले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jul-2019
Total Views |




नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभेचे गेले काही दिवस विविध अंकांमध्ये रंगलेले कानडी नाट्य मंगळवारी अखेर संपले आहे. विश्वासदर्शक ठरावात बहुमत सिद्ध करता न आल्याने मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे सरकार कोसळले. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या प्रदिर्घ चर्चेनंतर मंगळवारी विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्यात आले. ठरावाच्या बाजूने ९९ तर विरोधात १०५ मते पडल्याने मुख्यमंत्री कुमारस्वामींना आता पायउतार व्हावे लागणार आहे.

 

कुमारस्वामी सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावेळी राज्यात १४४ कलम लागू करण्यात आले होते. कुमारस्वामींनी त्यापूर्वी केलेल्या भाषणात अत्यंत भावूकपणे भाषण केले होते. त्यात मी अपघाताने मुख्यमंत्री झालो, असा उल्लेखही त्यांनी केला. सायंकाळी ७.३० वाजता विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्यात आले होते. राजीनामा दिलेले १६ आमदार उपस्थित न राहिल्याने बहुमताचा आकडा १०३ असा होता. मात्र, कुमारस्वामी सरकारला तोही गाठता न आल्याने त्यांना पायउतार व्हावे लागले.

 

भाजपचे एकही मत फुटले नाही

विरोधी पक्षात असलेल्या भाजपचे एकही मत फुटलेले नाही. जेडीएस-कॉंग्रेसचे १६ आमदार अनुपस्थित राहिल्याने कुमारस्वामींना हा विश्वासदर्शक ठराव जिंकता आला नाही. अवघ्या चार मतांनी सरकार कोसळल्याने कर्नाटकात राजकीय उलथापालथ झाली असून याचे पडसाद दिल्लीतील कॉंग्रेसच्या राजकीय वर्तूळात उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@