बोरिस जॉनसन्स होणार ब्रिटनचे पंतप्रधान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jul-2019
Total Views |


 


लंडन : लंडनचे माजी महापौर बोरिस जॉनसन्स हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान असणार आहेत. ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्या जागी विराजमान होण्यासाठी त्यांनी पंतप्रधानांच्या शर्यतीतून जेरमी हंट यांना पराभूत केले. बेरिस जॉनसन्स यांचा शपथविधी सोहळा बुधवारी होणार आहे.

 

बोरिस जॉनसन्स हे कंजरव्हेटीव्ह पक्षाचे नेते आहेत. जॉनसन्स हे ब्रिटनचे विदेश मंत्रीही राहीले आहेत. ब्रिटन युनियनशी ब्रेग्झिट करार करण्यास असमर्थ ठरल्याने ७ जून रोजी थेरेसा मे यांनी राजीनामा दिला होता. कंजरव्हेटीव्ह पक्षातर्फे जेरेमी हंट आणि बोरिस यांच्यापैकी एकाला पंतप्रधान पदावर नियुक्त करण्याच्या निर्णयावर विचार करण्यास सांगितले होते.

 

जॉनसन्स यांची नियुक्ती निश्चित मानली जात होती. ब्रिटनच्या पंतप्रधान पदासाठी सत्तारुढ कंजरव्हेटीव्ह पक्षाच्या नेतेपदासाठी सोमवारी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यापैकी १.६० लाख कार्यकर्त्यांनी मतदान केले. जॉनसन्स आणि हंट यांच्यात गेल्या महिन्याभरापासूनच पंतप्रधानासाठी दावेदार मानले जात होते. ब्रेग्झिट कराराची प्रक्रिया करण्यास असमर्थ ठरल्यामुळे थेरेसा मे यांनी राजीनामा दिला होता. मंगळवारी कॅबिनेट बैठकीत त्यांनी सहभाग घेणार आहेत. राणी एलिझाबेथ यांच्याकडे त्या आपला राजीनामा सुपूर्द करणार आहेत. त्यानंतर पुढील पंतप्रधानांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@