आता धोनी घेणार सैन्याचे प्रशिक्षण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jul-2019
Total Views |



नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक महेंद्र सिंग धोनीची भारतीय सैन्याचे प्रशिक्षण घेण्याची इच्छा आता पूर्ण होणार आहे. लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी धोनीची विनंती मंजूर केली आहे. आता पॅराशूट रेजिमेंटमध्ये २ महिन्याचे प्रशिक्षण घेणार आहे. हे प्रशिक्षण जम्मू काश्मीर येथे होऊ शकते असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. परंतु धोनी कोणत्याही ऑपरेशन्समध्ये सहभागी होऊ शकत नाही असेही रावत यांनी सांगितले आहे.

 

महेंद्रसिंग धोनी हा टेरिटोरियल आर्मीच्या पॅराशूट रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट कर्नल आहे. आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यामधून धोनीने माघार घेऊन २ महिन्यांचा ब्रेक घेतल्याचे सांगितले. बीसीसीआयला याबद्दल कळवण्यात आले होते. त्याच्याऐवजी संघामध्ये रिषभ पंतचा समावेश करण्यात आला होता. तसेच धोनी आता पॅराशूट रेजिमेंटमध्ये प्रशिक्षण घेणार आहे.

 

२०११ मध्ये लेफ्टनंट कर्नल पद

 

भारतीय सैन्याने २०११मध्ये महेंद्रसिंह धोनीला टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नल हे मानद पद दिले होते. लहानपणापासूनच फौजी बनण्याची माझी इच्छा होती. रांचीच्या कँट परिसरात मी कायम फिरायला जात असे, असे धोनीने एका मुलाखतीत सांगितले होते. परंतु नशिबाला हे मंजूर नव्हते. तो फौजी बनला नाही पण क्रिकेटर बनला. मात्र यानंतर लेफ्टनंट कर्नल हे मानद पद मिळाल्यानंतर त्याची सैन्यात जाण्याची काही प्रमाणात का होईना पूर्ण झाली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@