हिमा दासचा 'सुवर्ण पंच'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jul-2019
Total Views |



नवी दिल्ली : भारताची युवा धावपटू हिमा दास हिने आणखी एका सुवर्ण पदकावर मोहोर उमटवली आहे. हिमाने चेक प्रजासत्ताकमध्ये नोवे मेस्टो नाड मेटुजी ग्रां.प्री. स्पर्धेत महिलांच्या ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत पहिले स्थान पटकावत सुवर्ण पदकावर स्वतःचे नाव कोरले. चेक रिपब्लिकमधील या स्पर्धेत भारताच्या व्ही. के. विस्मयाने दुसरे स्थान पटकावले. विस्मयाने ४०० मीटरचे अंतर ५२.४८ सेकंदात पार केले. तर तिसऱ्या स्थानी आलेल्या सरिताबेन गायकवाड हिने हेच अंतर ५३.२८ सेकंदात पार केले.

 

पुरुषांच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताच्या नोह निर्मल टॉम याने ४६.०५ सेकंदासह रौप्यपदक पटकावले. कझाकस्तानच्या माझेन अल-यासिन याने ४५.९८ सेकंद अशी कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरले. पुरुषांच्या २०० मीटर शर्यतीत मोहम्मद अनास याने २०.९५ सेकंदासह रौप्यपदक जिंकले.

 

हिमाची या महिन्यातील कामगिरी

 

- २ जुलैला पोजनान अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत २०० मी. शर्यतीत सुवर्ण पदक

- ७ जुलैला कुटनो अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत २०० मीटर शर्यतीत सुवर्ण पदक

- १३ ला जुलै चेक प्रजासत्ताक येथे क्लांदो अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत २०० मीटर शर्यतीत सुवर्ण पदक

- १८ जुलैला झेक प्रजासत्ताक टबोर अ‍ॅथलेटिक्स मीट स्पर्धेत २०० मीटर शर्यतीत सुवर्ण पदक

- २० जुलै जेक प्रजासत्ताक नोवे मेस्टो नाड मेटुजी स्पर्धेत ४०० मीटर शर्यतीत सुवर्ण पदक

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@