
नवी दिल्ली : मध्यप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल यांच्यासह सहा राज्याच्या नव्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. मध्यप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची उत्तरप्रदेशच्या राज्यपाल पदी नेमणूक करण्यात आली, जगदीप धनाखर यांची पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली तर बिहारचे राज्यपाल लाल जी टंडन यांची मध्यप्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या नियुक्त्या केल्या.
बिहारच्या राज्यपालपदी फागु चौहान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्रिपुराच्या राज्यपालपदी रमेश बैस व आर एन रवी यांची नागालँडच्या राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्रिपुराचे राज्यपाल कप्तानसिंह सोलंकी, प. बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी, उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक व नागालँडचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांचा कार्यकाळ लवकरच पूर्ण होत असल्याने या नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat