प्रो कब्बडी' चा थरार आजपासून रंगणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jul-2019
Total Views |

 

 
नवी दिल्ली : प्रो कब्बडीच्या ७ व्या पर्वाला आजपासून सुरुवात होणार आहे. अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या या लीगमध्ये ७५ दिवसात एकूण १३७ सामने होणार आहेत. प्रो-कबड्डीच्या मागील सहा सीझनला मिळालेल्या यशानंतर आयोजकांनी यावेळी स्पर्धेच्या स्वरूपात काही महत्त्वाचे बदल केले आहेत. ही स्पर्धा डबल राउंड रॉबिन फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. या बदलामुळे प्रत्येक संघ प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध दोनदा खेळताना दिसेल. चाहत्यांसाठी ही पर्वणी ठरणार आहे.
 
 
पहिला सामना हैदराबादच्या गाचीबावली इनडोअर स्टेडियमवर यू मुंबा आणि तेलुगू टायटन्समध्ये रंगणार आहे. स्पर्धेतील लक्षवेधी लढत संध्याकाळी गतविजेता संघ बेंगळुरू बुल्स आणि तीनवेळा चॅम्पियनशीप पटकावणाऱ्या पटना पायरेट्समध्ये याच स्टेडियमवर होणार आहे. हैदराबाद, मुंबई, पाटणा, अहमदाबाद, चेन्नई, दिल्ली, बेंगळुरू, कोलकाता, पुणे, जयपूर, पंचकुला, ग्रेटर नॉएडा अशा १२ शहरांमध्ये हे सामने रंगणार आहेत. मात्र, सर्व सामन्यांच्या जागा अद्याप निश्चित झालेल्या नाहीत.
  

प्रो-कबड्डीच्या सातव्या सीझनमध्ये १२ संघ सहभागी होणार आहेत. साखळी फेरीत प्रत्येक संघाला चार सामने खेळता येणार आहेत. वॉरियर्स, बेंगळुरू बुल्स, दबंग दिल्ली के. सी., गुजरात फॉर्चुन जायंट्स, हरयाणा स्टीलर्स, जयपूर पिंक पॅंथर्स, पाटणा पायरेट्स, पुणेरी पलटण, तामीळ थलैवाज, तेलुगू टायटन्स, यू मुंबा, यूपी योद्धा हे संघ सहभागी होणार आहेत.

 

 

 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat
@@AUTHORINFO_V1@@