ऑस्करतर्फे झोया अख्तर, अनुपम खेर आणि अनुराग कश्यप यांना निमंत्रण

    02-Jul-2019
Total Views |

 

ऑस्कर हा चित्रपट जगतातील एक सर्वोच्च सन्मान म्हणून नावाजला गेला आहे. याच ऑस्करसाठी २०१९ वर्षातील काही नवीन सदस्यांच्या नावांची घोषणा नुकतीच करण्यात अली. नुकत्याच जाहीर झालेल्या या नावांच्या यादीत अनुपम खेर(हॉटेल मुंबई), झोया अख्तर (गली बॉय), शेरी भारदा (हीचकी), श्रीनिवास मोहन (बाहुबली बिगिनिंग) आणि अनुराग कश्यप (बॉंबे टॉकीज) या सर्वांचा समावेश करण्यात आला आहे.

१० विभागांमधील प्रतिष्टीत आणि चित्रपट क्षेत्रात वाखाणण्याजोगे योगदान दिलेल्या नावांचा समावेश करण्यात येतो. यावर्षीच्या या कलाकारांच्या यादीमध्ये भारतातील काही लोकप्रिय व्यक्तिमत्वाचा देखील समावेश करण्यात आला आहे.

 

यावर्षी ५९ देशांमधून ८४२ प्रतिष्ठित व्यक्तींना ऑस्करतर्फे निमंत्रण देण्यात आले आहे. ज्यामध्ये सर्वात जास्त महिलांचा समावेश असून २०१५ मध्ये ऑस्करतर्फे निमंत्रित करण्यात आलेल्या व्यक्तींमधील महिलांची संख्या २५ टक्क्यांवरून वाढून या वर्षी ३२ टक्के इतकी वाढली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat