'कबीर सिंह' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच धूम उडवली. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी आज याविषयी सोशल मीडियावरून प्रेक्षकांना माहिती दिली. 'कबीर सिंह' या चित्रपटाच्या प्रदर्शनाला साधारण २ आठवडे पूर्ण झाले असून चित्रपटाने आत्तापर्यंत १९० कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे सलमान खानच्या 'भारत' चित्रपटामध्ये आणि 'कबीर सिंह' या चित्रपटात बॉक्स ऑफिसवर चुरशीची लढाई पाहायला मिळेल.
कबीर सिंह हा चित्रपट तामिळ मधील अर्जुन रेड्डी या चित्रपटाचा रिमेक असून यामध्ये शाहिद कपूर आणि किआरा अडवाणी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. मात्र शाहिद कपूर मुख्य भूमिकेत असून एवढी विक्रमी कमाई करणारा हा त्याचा पहिलाच चित्रपट ठरला आहे.
या आधी प्रदर्शित झालेल्या भारत चित्रपटाने २०० कोटींचा एकदा पार केला होता, आता कबीर सिंह या कमाईला टक्कर देत किती पुढे सरकतो हे पाहणे चाहत्यांसाठी एक औत्सुक्याची बाब ठरेल.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat