बिग बॉस मराठी सिझन २ - दिवस ३७ !

    02-Jul-2019
Total Views |


- हीना आणि शिवमध्ये वाद

- घरातील सदस्यांची झाली पळापळ

 

मुंबई: बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टनसी टास्क वीणा आणि माधवमध्ये पार पडला. ज्यामध्ये माधवने बाजी मारून घराचा नवा कॅप्टन होण्याचा मान पटकवला. तसेच काल घरामध्ये नॉमिनेशन कार्य देखील पार पडले. ज्यामध्ये किशोरी शहाणे, सुरेखा पुणेकर, हिना पांचाळ, वैशाली म्हाडे आणि रुपाली भोसले नॉमीनेट झाले. आता या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाणार ? कोणाला प्रेक्षकांची मतं वाचवणार ? हे बघणे रंजक असणार आहे.

हीना आणि शिवमध्ये बरेच वाद होत असतात. मग ते वीणा वरून असो वा टास्क दरम्यान असो. आज देखील हीना आणि शिवमध्ये वादाची ठिणगी उडणार आहे. ग्रुपमधील सदस्य एकत्र बसले असताना वैशाली, शिव आणि अभिजीत यांच्यामध्ये गप्पा सुरु होत्या आणि ते एकमेकांची मज्जा करत होते. हीना अभिजीतला हाताला लागल्यामुळे क्रेप बँडेज लावत होती. तर वैशाली शिवला अभिजीत वरून म्हणाली, "नात्यांमध्ये तो गल्लत करत नाही" त्यावर अभिजीत देखील म्हणाला अगदीच खरे आहे. आणि शिवने यावरून अभिजीतला चिडवायला सुरुवात केली. पण कुठेतरी हीनला या गोष्टीचा राग आला आणि ती शिववर भडकली. हीनाने शिवला खडसावून सांगितले, पुन्हा असं बोलास तर मी खूप घाणेरड्या शब्दांत उत्तर देणार". यावर शिव देखील तिला म्हणाला तुझ्याशी गंमत नाही केली का मी, माझ्याशी असं बोलायचं नाही" शिव इथेच थांबला नाही तो पुढे म्हणाला, तुला गोष्टी नाही कळत तर मला विचार". शिव असे काय म्हणाला ज्यावरून हीना त्याच्यावर इतकी चिडली ? आता हे भांडण किती विकोपाला जाणार, कोण नमते घेणार हे कळेल आजच्या भागामध्ये.



माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat