
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राजस्थानमध्ये 'सुपर ३०' हा चित्रपट कर मुक्त करण्याचा निर्णय आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केला. 'सुपर ३०' हा चित्रपट तरुणांमध्ये शिक्षकांविषयी आस्था निर्माण करणारा आणि समाजामध्ये शिक्षणाविषयी जनजागृती करणारा चित्रपट असल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
गणितज्ञ आनंद कुमार यांच्या सत्य कथेवर आधारित 'सुपर ३०' हा चित्रपट असाधारण इच्छाशक्ती आणि दृढनिश्चयाचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. सर्व अडचणी असूनही - यश मिळवणे शक्य आहे हा संदेश चित्रपटामधून प्रेक्षकांना देण्यात आला आहे.
ह्रितिक रोशन मुख्य भूमिकेत असलेला 'सुपर ३०' हा चित्रपट विकास बहल यांनी दिग्दर्शित केला असून १२ जुलैला हा चित्रपट देशभर प्रदर्शित झाला होता. मात्र आता राजस्थानमध्ये हा चित्रपट करमुक्त झाल्यामुळे चित्रपटकर्त्यांसाठी तसेच चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बाब आहे.
We must take inspiration from such films and imbibe the value of 'excellence in education' in the youth of our society today. I hereby declare this film tax-free in the state of #Rajasthan.#Super30
— Ashok Gehlot (@ashokgehlot51) July 18, 2019
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat