पाकिस्तान झुकला ; कुलभूषणाला राजनैतिक मदत देण्यास तयार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jul-2019
Total Views |


 


इस्लामाबाद : हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानमधील तुरुंगात असलेले कुलभूषण जाधव यांच्या खटल्या प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली. 'आयसीजे'ने भारताच्या बाजूने निकाल दिल्यानंतर अवघ्या २४ तासातच पाकिस्तानने भारतासमोर गुघडे टेकवले आहेत. कुलभूषण जाधव यांना व्हिएन्ना करारातील परिच्छेद ३६ मधील १ (बी) नुसार त्यांना राजनैतिक मदत मिळण्याचे अधिकार असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.

 

पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने हेरगिरीचा आरोप ठेवून कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरोधात भारताने आयसीजेकडे धाव घेतली. या प्रकरणाची सुनावणी करताना आयसीजेने जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली. त्यानंतर जाधव यांना पाकिस्तानच्या कायद्यानुसार राजनैतिक मदत देण्यात येणार असून त्यावर कार्यवाही सुरू करण्यात आल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.

 

कुलभूषण जाधव यांना राजनैतिक मदत देण्याची भारताची मागणी पाकिस्तानने तब्बल १६ वेळा फेटाळून लावली होती. मात्र आयसीजेच्या निकालानंतर पाकिस्तानने गुघडे टेकवले असून वाढत्या दबावानंतर कुलभूषण जाधव यांना भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्याची पाकिस्तानने परवानगी दिली. त्यामुळे आता यांना कायदेशीर मदत मिळणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@