बीसीसीआयचा विराट कोहलीला झटका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jul-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : सध्या भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन प्रशिक्षकाची निवड प्रक्रिया सुरु झाली आहे. यासंदर्भात बीसीसीआयने इच्छुकांचे अर्जदेखील मागवले आहेत. परंतु, यावेळी प्रशिक्षपदाच्या निवडीमधून कर्णधार विराट कोहलीला लांब ठेवण्यात आले आहे. २०१७मध्ये झालेल्या प्रशिक्षक निवड प्रक्रियेत कर्णधार विराट कोहलीचे मत विचारात घेण्यात आले होते. तेव्हा माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळेंनी राजीनामा दिल्यानंतर रवी शास्त्री यांची निवड करण्यात आली होती.

 

सूत्रांच्या माहितीनुसार, यावेळी प्रशिक्षकाची निवड करताना विराट कोहलीचे मत विचारात घेतले जाणार नाही. २०१७मध्ये जेव्हा रवी शास्री यांची प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली होती तेव्हा विराटचे मत विचारात घेण्यात आले होते. यावेळी प्रशिक्षकासंदर्भातील अंतिम निर्णय माजी क्रिकेटपटू कपिल देव घेतील. त्यानंतर प्रशासकिय समिती यावर शिक्कामोर्तब करणार आहे. २०१७मध्ये जेव्हा प्रशिक्षक असलेले अनिल कुंबळे यांचा कालावधी वाढवण्यात आला नव्हता. तेव्हा देखील विराट कोहलीचे मत विचारात घेतले होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@