…तर टिक टॉक, हॅलो होणार बंद !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jul-2019
Total Views |


चाईल्ड प्रायव्हसी आणि देशविरोधी मुद्द्यांसह अन्य प्रश्नांवर केंद्र सरकारने मागवले उत्तर

 


नवी दिल्ली : सोशल मीडियावर अनेकांच्या गळ्यातील ताईत असणारे टिक टॉक आणि हॅलो हे दोन्ही अॅप पुन्हा एकदा वादाचा मुद्दा बनले आहेत. केंद्र सरकारने दोन्ही कंपन्यांना नोटीसा बजावत एकूण २१ प्रश्नांची उत्तरे मागविली आहेत. या प्रश्नांची उत्तरे केंद्र सरकारला न मिळाल्यास दोन्ही अॅपवर बंदी येऊ शकते.

 

स्वदेशी जागरण मंचातर्फे तक्रार दाखल

स्वदेशी जागरण मंचातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत तक्रार करण्यात आली असून पंतप्रधान कार्यालयाने याची गंभीर दखल घेतली आहे. इलेक्ट्रोनिक आणि सूचना प्रद्योगिक मंत्रालयाने ही नोटीस संबंधित कंपन्यांना पाठवली आहे.

 

डेटा सुरक्षेच्या मुद्द्यावरून विचारले प्रश्न

दोन्ही अॅपद्वारे देशहितविरोधी कृत्य केली जात असल्याचा आक्षेप स्वदेशी जागरण मंचाने घेतला आहे. या दोन्ही कंपन्यांकडे याचे उत्तर मागण्यात आला आहे. भारतीय ग्राहकांचा डेटा सुरक्षित आहे का ?, त्याचे संकलन भारतातील सर्व्हरद्वारे केले जात आहे का ? आणि भविष्यात अशा प्रकारचे हस्तांतरण करणार नसल्याची हमीही मागितली आहे.

 

फेक न्यूज रोखण्यासाठीच्या उपाययोजनांची मागवली माहीती

केंद्रीय मंत्रालयाने पाठवलेल्या पत्रानुसार, या दोन्ही अॅपतर्फे चुकीची माहिती अफवा व खोट्या बातम्या रोखण्यासंदर्भात काय उपाययोजना केली आहे का, त्या संदर्भातही माहिती मागवली आहे. या अॅपद्वारे ११ हजार मॉर्फ्ड जाहिराती केल्याबद्दलही स्पष्टीकरण मागितले आहे. भारतात १८ वर्षांपर्यंत मुल प्रोढ मानले जात नाही. मात्र, या अॅपवर युझर्सची मर्यादा किमान १३ वर्षे आहे. त्याबद्दलही सरकारने उत्तर मागवले आहे. याचद्वारे चाईल्ड प्रायव्हसीचा मुद्दा उपस्थित केला आहे.

 

टिट टॉट आणि हॅलो करणार सहकार्य

या संबंधित टिक टॉक आणि हॅलोतर्फे संयुक्त स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यात भारतातील डिजिटल क्रांतीबद्दल सरकारचे आभार मानण्यात आले आहेत. आमची सफलता ही जनतेच्या आधारविना अशक्य असून आम्ही आमच्या जबाबदाऱ्या पूर्णपणे भान ठेवून पूर्ण करत असल्याचेही म्हटले आहे. केंद्र सरकारच्या सर्व प्रश्नांची आम्ही समाधानकाराक उत्तरे देऊ, असे स्पष्टीकरण कंपन्यांतर्फे देण्यात आले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@