'मोस्ट वॉन्टेड' हाफिज सईदला अटक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jul-2019
Total Views |



नवी दिल्ली : मुंबईतील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदला पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील दहशतवादविरोधी पथकाने हाफिजला बेड्या ठोकल्या. त्याची रवानगी सध्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. यामुळे दहशतवादाविरोधात भारताच्या दबावाला मोठे यश मिळाले आहे.

 

गुजरनवालाहून लाहोरमध्ये जाताना हाफिज सईदला अटक करण्यात आली. पाकिस्तानात दहशतवादाविरोधात काम करणारी सरकारी संस्था काऊंटर टेरोरिझम डिपार्टमेंट अर्थात सीटीडीने हाफिज सईदला बेड्या ठोकल्या. हाफिज सईद हा दहशतवादी संघटना जमात-उद-दावाचा प्रमुख आहे. तसेच लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा तो सह-संस्थापकही आहे. भारतातील अनेक दहशतवाई हल्ले या दोन संघटनांनी केले आहे. हाफिज सईद हा मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. अमेरिकेने हाफिज सईदवर एक कोटी डॉलरचे इनामदेखील जाहीर केला होते. इंटरपोलने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी केली होती.

 

पाकिस्तान आर्थिक परिस्थिती सध्या अत्यंत बिकट आहे. आर्थिक आघाडीवर तग धरून राहण्यासाठी पाकिस्तानला जागतिक पातळीवरून मोठ्या प्रमाणावर मदतीची गरज आहे. त्यासाठी पाकिस्तान सरकारने त्यांच्या देशातील दहशतवादी संघटना व व्यक्तींवर ठोस कारवाई करावी, असा दबाव येत आहे. फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सकडून पाकला काळ्या यादीत टाकले जाण्याची शक्यता आहे. या भीतीतूनच सईदवर अटकेची कारवाई केली गेली असल्याची चर्चा आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@