आयकर भरण्याबद्दल सोशल मीडियावर अफवा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jul-2019
Total Views |




नवी दिल्ली : आयटीआर २, आयटीआर ३ मध्ये बदल केल्यामुळे भरणा करताना अडचणी येत असल्याची अफवा सोशल मीडियावर उठली होती. मात्र, आम्ही या प्रकारचे कोणतेही बदल केले नसल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय आयकर विभागाने दिले आहे.

 

११ जुलै रोजी आयटीआर २, आयटीआर ३ मध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झाल्याने करभरणा अडचणी येत असल्याची तक्रार सोशल मीडियाद्वारे करण्यात आली होती. या संबंधित वृत्त अनेक प्रसिद्धीमाध्यमांनीही केले होते. आयकर विभागाने यापूर्वीच ई-कर भरणा करण्यासाठी फार पूर्वी बदल केले होते. वापरकर्त्यांकडून मिळालेल्या सूचनांनुसार त्याप्रणालीत बदल करण्यात आले होते.

 

आयकर विभागाने संकेतस्थळात बदल केल्यामुळे करदात्यांना आयकर भरताना अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आत्तापर्यंत २०१९-२०२० या आर्थिक वर्षात एकूण १.३८ कोटी करदात्यांनी कर भरणा केल्याचेही आयकर विभागाने यावेळी सांगितले. तसेच नव्याने बदल झाल्यास करदाता आपल्या लॉईन आयडीचा वापर करून पुढील प्रक्रीया कायम ठेवू शकतो, असेही त्यात सांगण्यात आले.

 

आयकर विभागाने कोणताही बदल किंवा अद्यावतन केले नसून केवळ काही करदात्यांसाठी काही गोष्टींचे सुलभीकरण केल्याचेही यात म्हटले आहे. आयटीआर २, आयटीआर ३ मध्ये ११ जुलै रोजी काही बदल करण्यात आले होते, मात्र, त्याबद्दल चुकीची माहीती सोशल मीडियावर पसरवण्यात आली आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@