कुलभूषण जाधवप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात निकाल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jul-2019
Total Views |



नवी दिल्ली : पाकिस्तानच्या कैदेत असलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेप्रकरणी द हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालय (आयसीजे) बुधवारी निकाल देणार आहे. हा निकाल आपल्या बाजूने लागेल, अशी भारताला आशा आहे.

 

पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने हेरगिरीच्या आरोपांतर्गत ४९ वर्षीय कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, या शिक्षेविरोधात भारताने आयसीजेकडे ८ मे, २०१७ रोजी धाव घेतली होती. या प्रकरणाची सुनावणी करताना आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या दहा सदस्यीय घटनापीठाने १८ मे, २०१७ रोजी जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली होती.

 

तसेच आपला निर्णय सुरक्षित ठेवला होता. आता न्यायालय उद्या आपला निकाल देणार आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे सरन्यायाधीश अब्दुलकवी अहमद युसूफ हे या निकालाचे वाचन करणार आहेत. कुलभूषण जाधव यांच्याकडून पाकिस्तानने जबरदस्तीने कबुलीजबाब वदवून घेतल्याचे भारताची बाजू मांडताना प्रख्यात विधिज्ञ हरीश साळवे यांनी म्हटले होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@