भारताच्या इलावेनिलचा 'सुवर्ण विश्वविक्रम'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jul-2019
Total Views |




नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट फेडरेशनच्या (आयएसएसएफ) ज्युनिअर विश्वकरंडक स्पर्धेत भारताच्या इलावेनिल वालारिवानने सुवर्णपदक पटकावले. आपलीच साथीदार मेहुली घोष हिला १.४ अशा गुणांनी हरवले आणि एक विश्वविक्रम प्रस्थापित केला. इलावेनिलने या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात २५१.६ गुण मिळवले. तसेच मेहुलीने दुसरे तर फ्रांसच्या मारियाने म्युलरने तिसरे स्थान मिळावत कांस्य पदक राखले.

 

इलावेनिल आणि मेहुलीने श्रेया अगरवालसोबत ६२५.४ गुणांसह सांघिक सुवर्णपदकही पटकावले आहे. या तिघांनी मिळून १८८३.३ गुण मिळवत ज्युनिअर विश्वकरंडक स्पर्धेत विक्रम प्रस्थापित केला. या स्पर्धेत पदकांच्या आकडेवारीत भारताने प्रथम स्थान काबीज केले आहे. भारताने सहा सुवर्ण, सहा रौप्य आणि दोन कांस्य पदक पटकावले आहेत. रुस आणि नॉर्वे या देशांना दोन सुवर्ण तर, चीन, ऑस्ट्रिया, थाईलँड आणि जर्मनीला प्रत्येकी एक-एक सुवर्णपदक मिळाले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@