‘ओव्हर-थ्रो’च्या वादावर आयसीसीचे 'नो कमेंट्स'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jul-2019
Total Views |



मुंबई : विश्वचषक स्पर्धा जरी संपली असली तरी अजूनही त्यामध्ये घडलेल्या चुकांमुळे चर्चा मात्र थांबता थांबत नाही आहे. अंतिम सामान्यांमधील नियमांवर आक्षेप घेत अनेकांनी आयसीसीवर टीका केली. या ओव्हर थ्रोमुळे निर्माण झालेल्या वादावर अखेर आयसीसीने यावर उत्तर दिले. मात्र, तरीही प्रश्न कायमच आहे. नियमातून समजलेल्या व्याख्यानुसार मैदानावर उपस्थित असणाऱ्या पंचांनी ओव्हर थ्रोच्या सहा धावा दिल्या आहेत. त्यामुळे आम्ही त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही असे आयसीसीकडून सांगण्यात आले.

 

इंग्लंडच्या फलंदाजीवेळी ५०व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर मार्टिन गप्तिलच्या ‘ओव्हर-थ्रो’वर इंग्लंडला सहा धावा मिळाल्या. तीन चेंडूंवर नऊ धावा हे समीकरण त्यामुळे दोन चेंडूंवर तीन धावा असे आटोक्यात आले. आणि इंग्लंडला सामना अनिर्णित करण्यात यश आले. त्यानंतर क्रिकेटमधील अनेक दिग्गजांनी पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे इंग्लंडला जेतेपद मिळाल्याचे भाष्य केलं. पंचाच्या या खराब कामगिरीमुळे आयसीसीवरही टीका करण्यात आली.

 

आयसीसीचे सगळ्यात नावाजलेले आणि सर्वोत्कृष्ट पंच म्हणून ५ वेळा सन्मानित झालेले ऑस्ट्रेलियाचे सायमन टॉफेल यांनीदेखील यावर आक्षेप घेतला. श्रीलंकेचे कुमार धर्मसेना आणि दक्षिण आफ्रिकेचे माराइस इरॅस्मस यांनी ६ धावा देण्याऐवजी ५ धावा देणे गरजेचे होते. त्यामुळे नियमांनुसार त्यांनी दिलेला निर्णय हा चुकीचा आहे, असे टॉफेल यांनी सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@