स्टम्पव्हिजन : इंग्लंडच लॉर्ड्सचे लॉर्ड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jul-2019   
Total Views |
 
 


यंदा २०१९ मध्ये इंग्लंड यजमान होते आणि तेही वर्ल्डचॅम्प ठरले आता पुढील २०२३ चा वर्ल्डकप भारतात होणार आहे... आकड्यांवर विश्वास ठेवला तर आता काऊंटडाऊन सुरू झालंय...

 

क्रिकेटच्या पंढरीत लॉर्ड्सवर, क्रिकेटचे जन्मदाते इंग्लंडनं वर्ल्डकप जिंकत आपणचं लॉर्ड्सचे लॉर्डस असल्याचं जगाला दाखवून दिलं. आजवर इंग्लंडनं या जगाला जेम्स बाँडचा थरार दिलाय... शेरलॉक्स होम्सची रहस्यमयता दिलीय... आणि हो हॅरी पॉटरची जादूई कमालही...पण लॉर्डसवरील क्रिकेटच्या या सुपर फायनलमध्ये या सहस्रकातील सर्वोत्कृष्ट थरार, रहस्यमयता आणि जादुई कमाल एकत्रित पहायला मिळाली. एकदा नव्हे तर एकाच मॅचमध्ये तब्बल दोनदा मॅच टाय आणि तेही वर्ल्डकपच्या फायनलमध्ये...

 

केवळ अशक्यप्राय अशा या एतिहासिक घटनेचं साक्षिदार होण्याची संधी जगभरातील क्रिकेटप्रेमींना या निमित्तानं पहायला मिळाली. या फायनलमध्य काय नव्हते... आनंद होता...दुख: होतं... रुखरुख होती... हताशा होती...चुटपूट होती...निराशा होती... जोश होता आणि जल्लोषही होता. रन्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर इंग्लंड आणि न्युझीलंडच्या धावा समसमान झाल्या... निर्धारीत ५० ओव्हर आणि सुपर ओव्हरमध्येही... पण क्रिकेटच्या बादशहाची ताजपोषी ठरली ती सर्वांधिक चौकार कुणी मारले यावरुन...न्युझीलंडच्या १४ चौकारांच्या तुलनेत इंग्लंडनं २४ चौकार ठोकले होते. पण हाच निकाल जर सिक्सरवर ठरवला असता तर मात्र न्युझीलंड विश्वविजेते ठरले असते. कारण इंग्ल्डंच्या २ सिक्सरच्या तुलनेत न्युझीलंडनं ३ सिक्सर ठोकले होते...

 

सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये न्युझीलंडला पराभव पत्करावा लागलाय, पण हा पराभव जास्त जिवारी लागणारा होता. पुढील अनेकवर्ष न्युझीलंडला हा पराभव सतावत राहील... गुप्तीलच्या थ्रोवर जर शेवटच्या ओव्हरमध्ये बाईजवर चौकार गेला नसता तर... किंवा त्या आधीच्या नीशमच्या ओव्हरमध्य बेन स्टोक्सचा लाँग ऑनवर बोल्टनं सहज झेल घेतला, काही फुटांवर पुन्हा गुप्तीलच उभा होता. पण झेल घेतल्याच्या नादात बोल्टनं एक पावूल होय फक्त एक पावूल मागे टाकलं आणि नेमकं ते पावूल सीमारेषेवर पडलं आणि इंग्लंडला ६ रन्समिळाले. बोल्टचं मागे पडलेलं एक पावूल न्युझीलंडला वर्ल्डकपपासून कित्येक मैल मागे घेऊन गेले. गुप्तील कदाचित त्याला सावध करु शकला असता, पण जर तर ला युध्दात काहीच अर्थ नसतो, गुप्तीलचे ओव्हर थ्रोवरील दुर्दैवी चार रन्स आणि बोल्टचे ते दुदैवी सहा रन्स न्युझीलंडच्या हृदयावर अश्वथाम्याच्या जखमेसारके यापुढे भळभळत राहतील...

 

पराभव ही यशाची पहिली पायरी असते असे आपण आजवर नेहमिच वाचत आलोय. पण इंग्लंडनं ते यंदा सत्यात उतरवून दाखवलं. गेल्या २०१५च्या वर्ल्डकपमध्ये पहिल्याच फेरीत बाद झालेल्या इंग्लंडनं पुढच्या चार वर्षात चक्क विश्वविजेतेपदाला गवसणी घातलीय. आणि याचे सारे श्रेय टीम इंग्लंडला तर दिलेच पाहिजे पण त्याआधी इंग्लंडचे क्रिकेट संचालक अँण्ड्र्यू ट्रॉस, प्रशिक्षक ऑस्ट्रेलियाचे ट्रेव्हर बायलिस, आणि कॅप्टन मॉर्गनलाय... इंग्लंड संघात जिंकण्याची आक्रमक जिद्द या तिघांनी निर्माण केली.

 

वर्ल्डकपला सामोरे जाताना इंग्लंडनं जागतिक वन डे क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर झेप घेत जगाला आपली दखल घ्यायला भाग पाडली होती. साखळीत एक वेळ अशी आली की इगंल्डंच आव्हान जवळपास संपुष्टात येणार होते. पण साखळीतील शेवटच्या दोन सामन्यात भारत आणि न्युझीलंडला पराभूत केले आणि सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभवाची धुळ चारली. परत फायनलमध्ये पुन्हा न्युझीलंडला पराभूत करत आपण लॉर्डसचे लॉर्ड् असल्याचं सिध्द केले. सेमी फायनलला पोहचलेल्या तीन्ही संघाना शेवटच्या सलग तीन सामन्यात पराभूत करणारे इंग्लंड खऱ्या अर्थानं वर्ल्ड चॅम्पियन ठरले.

 

जाता जाता... २०११ साली भारतानं वर्ल्डकपचं यजमानपद भुषविलं आणि भारत वर्ल्ड चॅम्पियन ठरला... २०१५ साली ऑस्ट्रेलिया यजमान होते तेही जगज्जेत ठरले.... यंदा २०१९ मध्ये इंग्लंड यजमान होते आणि तेही वर्ल्डचॅम्प ठरले आता पुढील २०२३ चा वर्ल्डकप भारतात होणार आहे... आकड्यांवर विश्वास ठेवला तर आता काऊंटडाऊन सुरु झालंय...

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@