मॉब लिंचिंगशी विहिंप सहमत नाही; देशात कायद्याचेच राज्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jul-2019
Total Views |


 


विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष अलोक कुमार यांचे प्रतिपादन

 

जळगाव :  मॉब लिंचिंग होते या विषयाशी आम्ही सहमत नाही. देशात कायद्याचे राज्य आहे. देश संविधानाचे पालन करत चालतो. एखादा जमाव केवळ जात धर्म पाहून कायदा हाती घेऊन कोणाला मारहाण करेल याच्याशी आम्ही सहमत नसल्याचे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) कार्याध्यक्ष अलोक कुमार यांनी केले. विहिंपची प्रांत बैठक जळगावात सुरु असून 'जळगाव तरुण भारत'ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ते बोलत होते. राम मंदिर, मॉब लिंचिंग, लोकसंख्या नियंत्रण कायदा, गोरक्षण अशा ज्वलंत विषयावर त्यांनी बातचीत केली.


मॉब लिंचिंग मॉब लिन्चींगच्या घटनांमध्ये विहिंपच्या कोणत्याही कार्यकर्त्याचे अद्यापपर्यंत नाव आले नसल्याचे आम्हाला समाधान वाटत असून अशा घटनांची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. दोन गटात भांडणे होत असतील तर त्याचे खरे कारण शोधले पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले. राम मंदिराच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, " राम मंदिराच्या प्रश्नावर २५ जुलै पासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायालयाच्या या सुनावणीत आमच्या बाजूने निकाल येणार व श्रीराम मंदिर निर्माणाचा मार्ग मोकळा होणार असा आम्हाला विश्वास आहे." राम मंदिराचा मुद्दा आमच्या विशेष प्राधान्यात येत नाही, असे ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. त्यावेळी आम्ही सरकारकडे मंदिर निर्माणाचा अध्यादेश आणण्याचा आग्रह केला होता. जर सुनावणी लांबत गेली तर आमचा तो आग्रह कायम राहील, असे कुमार म्हणाले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@