नवज्योत सिद्धूंकडून मंत्रिपदाचा राजीनामा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jul-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये सुरू असलेले राजीनामा नाट्य अद्याप सुरूच असून पंजाब सरकारचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी रविवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचा खुलासा केला. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याशी मतभेद झाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे समजते.

 

विशेष म्हणजे महिन्याभरापूर्वीच आपण मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र त्याचा आज खुलासा करण्यात आल्याचे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे 10 जून रोजीच आपण राजीनामा सोपविल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.


 

पंजाबमधील विधानसभेत सत्ता असूनही लोकसभा निवडणूकीत त्याचा फारसा फायदा झाला नाही. मुख्यमंत्री अरमिंदरसिंह यांनी या प्रकरणी सिद्धूंवर कारवाईची मागणी केली होती. ६ जून रोजी झालेल्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत अरमिंदर सिंह यांनी नवज्योतसिंह यांचेही खाते बदलले होते. या साऱ्यामुळे संतप्त झालेल्या सिद्धू यांनी कॉंग्रेस अध्यक्षांना पत्र लिहीत आपण मंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले.



 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@