भारतासाठी ऐतिहासिक क्षण ! उद्या झेपावणार 'चांद्रयान-२'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jul-2019
Total Views |
 

इस्रो'चे प्रमुख सिवान यांची घोषणा

नवी दिल्ली : भारताच्या बहुप्रतीक्षित 'चांद्रयान-२' मोहिमेचा मुहूर्त शनिवारी अखेर जाहीर करण्यात आला. सोमवारी मध्यरात्रीनंतर २ वाजून ५१ मिनिटांनी 'चांद्रयान-२' अंतराळात झेपावणार असल्याची घोषणा भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवान यांनी केली.


 

भारताच्या 'चांद्रयान-२' मोहिमेला १५ जुलैच्या मध्यरात्री २.५१ वाजता सुरुवात होणार आहे. या मोहिमेसाठी 'जीएसएलव्ही एमके-३' प्रक्षेपकाचा वापर केला जाणार आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण केल्यानंतर मानवरहित रोव्हरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पोहोचण्यास आणि चंद्रावर उतरण्यास सुमारे दोन महिन्यांचा कालावधी लागेल. स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून या रोव्हरची निर्मिती करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. सिवान यांनी केली.


 

या मोहिमेत चंद्रावर बर्फाचे अस्तित्व असल्याचा शोध लागल्यास, भविष्यात चंद्रावर मनुष्यवस्ती निर्माण होऊ शकते. या मोहिमेमुळे संशोधनासोबतच अंतराळ विज्ञानातही नवे मार्ग खुले होतील. प्रक्षेपणानंतर ५३ ते ५४ दिवसांत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर 'चांद्रयान-२' उतरेल आणि नंतरच्या पुढील १४ दिवस हे यान विविध माहिती घेण्याचे काम करेल, असे डॉ. सिवान यांनी सांगितले. 'चांद्रयान-२'च्या माध्यमातून इस्रो चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणार आहे.


 
 
९७८ कोटी रुपयांचा खर्च

या मोहिमेसाठी भारताला १४.१ कोटी डॉलर्स अर्थात, ९७८ कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. या मोहिमेत चंद्राच्या जमिनीखालील खनिजांचा शोध घेण्यात येणार आहे. ग्रहाच्या पृष्ठभागाचा नकाशा तयार करणे, पाण्याचा शोध घेणे इ. कार्य 'रोव्हर' करणार आहे, असे सिवान यांनी सांगितले.



 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@