नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी अडचणीत येण्याची शक्यता आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीवेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यात खोटी माहिती दिल्याने दिल्ली न्यायालयाने त्यांना नोटीस पाठवली. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी समर विशाल यांनी अभिषेक यांना २५ जुलै रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. अभिषेक हे डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.
वकील नीरज यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. अभिषेक यांनी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबत खोटी माहिती सादर केल्याचा आरोप नीरज यांनी केला होता. यावर अभिषेक बनर्जी यांच्या विरोधात खटला चालवण्यासाठी आवश्यक पुरावे उपलब्ध असून लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १२५ ए (खोटे निवेदना दाखल करणे) अंतर्गत त्यांना नोटीस बजावल्याचे न्या. विशाल यांनी सांगितले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat