अंशुला कांत जागतिक बँकेच्या पहिल्या महिला मुख्य वित्त अधिकारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jul-2019
Total Views |


 

 
नवी दिल्ली: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक अंशुला कांत यांची जागतिक बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य वित्त अधिकारीपदी निवड करण्यात आली आहे. जागतिक बँकेचे अध्यक्ष मालपैस यांनी हि माहिती दिली. अंशुला यांनी जागतिक बँकेच्या पहिल्या महिला आर्थिक वित्त अधिकारी होण्याचा मान मिळवला. अंशुला कांत यांच्यावर फायनांशियल आणि रिस्क मैनेजमेंटची जबाबदारी असेल.
 
 
अंशुला कांत यांच्याविषयी बोलताना मालपैस म्हणले,"अंशुला कांत यांना बँकिंग क्षेत्रात ३५ वर्षांचा अनुभव आहे. तसेच त्यांचे भारतीय स्टेट बँकेच्या व्यवस्थापकीय अंशुला संचालक असतानाचे योगदान बहुमूल्य आहे. केवळ एवढंच नाही तर त्या बँकिंग क्षेत्रातील नवीन तंत्रतज्ञानाच्या वापरासाठी ही ओळखल्या जातात.पुढे बोलताना असेही म्हणतात कि, जागतिक बँकेच्या इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठीपण अंशुला कांत यांच्याबरोबर काम करणे ही आनंदाची बाब असेल. त्यांचे मी स्वागत करतो. माझे सर्व कर्मचारी व अधिकारी त्यांच्या निर्णयास सहकार्य करेल." अंशुला कांत यांनी अर्थशास्त्र विषयातून ओनेर्स डिग्री मिळविलेली आहे तर पदव्युत्तर शिक्षण दिल्ली स्कूल ऑफ इकोनोमिक्स मधून पूर्ण केले आहे.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@