चीनी सैन्याच्या भारतीय सीमेवरील कुरापती वाढल्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jul-2019
Total Views |


 

लडाख : लडाख भागात भारत-चीन सीमारेषेजवळ चीनी चैन्याच्या कुरापती वाढल्या असून स्थानिक नागरिकांनाही त्याचा फटका सीमाभागातील नागरिकांनाही बसला. चिनी सैनिक लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल पासून ६ किलोमीटरपर्यंत भारतीय सीमेत घुसखोरी करून स्थानिकांवर उत्सव साजरी करू नये यासाठी धमकावत होते.

 

६ जुलै रोजी तिबेट येथील अध्यात्मिक धर्मगुरू दलाई लामा यांचा जन्मदिवस होता. जो जम्मू काश्मीरच्या लडाख सीमेवरील बौद्ध धर्मीय मोठ्या उत्साहात साजरी करतात. लडाख च्या दक्षिण-पूर्व भागात 'लाईन ऑफ एक्चुअल कंट्रोल' जवळ कोयुल, डेमचोक आणि डुंगती या गावात राहणाऱ्या बौद्ध उपासकांनी यावर्षीही या उत्सवाचे आयोजन केले होते.

 

या उत्सवावेळी भारतीय तिरंगा, बुद्धिस्ट फ्लॅग आणि तिबेटी फ्लॅग एकाच वेळी फडकविले जातात. गेली कित्येकवर्षे हा उत्सव साजरा केला जातो. परंतु, यंदाच्या वर्षी चीनमधील पीएएल तैनात जवानांनी हा उत्सव साजरी करू नये असा दबाव आणल्याचे स्थानिक नागरिकांकडून कळते.

 

हे सैनिक उत्सव सुरू असताना त्या ठिकाणी चिनी झेंडा फडकावून त्या क्षेत्रावर आपला हक्क सांगण्यात आला. इंडस नदीजवळील परिसरात चीनने पुन्हा घुसखोरी करून त्याठिकाणी चिनी झेंडे लावले. याबाबत स्थानिक नागरिकांनी सुरक्षा विभागाला याबद्दलची माहीती दिली. वारंवार चिनी सैनिक याभागात घुसखोरी करत असल्याची माहीती स्थानिकांनी दिली.

 

चीनने घुसखोरी करून पुन्हा एकदा भारताला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वीही लडाख मधून आंतरराष्ट्रीय सीमेत घुसखोरीचा प्रयत्न चीनने केला होता. आयटीएपीच्या जवानांनी चीन हा प्रयत्न रोखला होता. यावेळेस चीनच्या या हरकतीवर अजूनही भारतातर्फे कोणतिही अधिकृत प्रतिक्रीया देण्यात आलेली नाही.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@