ममतांवर 'जय श्रीराम' लिहिलेल्या पत्राचा मारा!

    08-Jun-2019
Total Views |



पोस्टमन आणि टपाल खात्याची उडाली धांदल


कोलकाता : पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील जय श्रीरामया घोषणेवरुन वाद सुरु आहे. या वादात मात्र पोस्टमन आणि टपाल खात्याची चांगलीच धांदल उडाल्याचे दिसून येत आहे. कारण बंगालमधील उत्तर २४ परगना आणि हावडा येथील आणि संपूर्ण भारतातील भाजपचे हजारो कार्यकर्त्यांनी ममता बॅनर्जींना 'जय श्रीराम' लिहिलेले पत्र पाठवायला सुरुवात केली. यामुळे दक्षिण कोलकात्यामधील कालीघाट पोस्ट ऑफिसमध्ये हजारो पत्रे येऊन पडली आहेत.

 

टपाल खात्यातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ममतांना दिवसाला साधारण ३० ते ४० पत्रे येत असतात. त्याचबरोबर रजिस्टर पत्रेही येत असतात, पण अलीकडे या पत्रांमध्ये कित्येक पटींनी वाढ झाली आहे. एवढंच नाही तर रेल्वे मेल सर्व्हिसकडूनही ममतांना पाठवण्यात आलेली ४५०० पत्रे वेगळी केली गेली आहेत. आता हा वाद इथेच थांबणार नसून तृणमुल काँग्रेसनेही पंतप्रधान नरेंद्र मोदींना जय हिंद’, ‘जय बांग्लालिहिलेले हजारो पत्र पाठवणार आहे. त्यामुळे आता ही हजारो पत्रे ममतांपर्यंत आणि पंतप्रधानांपर्यंत कशी पोहचवयाची हा प्रश्न टपाल खात्याला पडला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat