काही औषधनिर्मिती कंपन्यांना सीसीआयने लावला दंड

    07-Jun-2019
Total Views |



मध्य प्रदेश केमिस्ट ॲन्ड ड्रगीस्ट असोसिएशन
, इंदूर केमिस्ट असोसिएशन, हिमालया ड्रग कंपनी, इंटास फार्मास्युटिकल लिमिटेड सह त्यांच्या काही पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी स्पर्धात्मकता कायदा २००२ च्या तरतुदीचे उल्लंघन केल्याचे कॉम्पिटीशन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे भारतीय स्पर्धात्मकता आयोगाच्या निदर्शनाला आले आहे.

 

 

हिमालया ड्रग कंपनीला १८,५९,५८००० तर इंटास फार्मास्युटिकलला ५५,५९,६८,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या कंपन्यांच्या काही अधिकाऱ्यांनाही दंड आकारण्यात आला आहे.

 

मध्यप्रदेश केमीस्ट ॲन्ड ड्रगीस्ट असोसिएशनने स्पर्धात्मकता जागृतीसाठी मध्य प्रदेशात आपल्या सदस्यांसाठी सहा महिन्यातून किमान पाच कार्यक्रम आयोजित करावेत असे निर्देशही आयोगाने दिले आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat