शक्ती मिल कंपाऊंड....

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jun-2019   
Total Views |




विजय जाधव, कासिम बंगाली, सलीम अन्सारी या तिघांनी सत्र न्यायालयाच्या न्यायाला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली की, बलात्कार हा हत्येपेक्षा मोठा गुन्हा नाही. त्यामुळे त्यासाठी फाशीची शिक्षा देणे योग्य नाही. परंतु, न्या. बी. पी. धर्माधिकारी व न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळली. हे तिघेही शक्ती मिल कंपाऊंड बलात्कार घटनेचे गुन्हेगार. या तिघांनी यापूर्वीही बलात्कार केला होता. ३७६-इ कलमानुसार या तिघांना फाशीची शिक्षा सुनावली गेली. खरंतर स्त्रीला माणूस न समजता पशुप्रमाणे तिच्याशी वर्तन करणारे नराधम हे माणूस नाहीतच. गुन्हेगारांनी म्हणजेच विजय जाधव, कासिम बंगाली आणि सलीम अन्सारी यांनी बलात्कार हा हत्येपेक्षा मोठा गुन्हा नाही, अशी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या क्रूर गुन्हेगारांनी या आधीही असाहाय्य मुलींवर बलात्कार केला होता. त्याची लाज, खंत, खेद, पश्चात्ताप वगैरे काही न वाटता त्यांनी हत्या आणि बलात्काराची तुलना करत स्वतःची फाशीची शिक्षा टाळण्याचा प्रयत्न केला. शक्ती मिल कंपाऊंड बलात्कार प्रकरणात आणखी दोन जण गुन्हेगार आहेत. त्यापैकी सिराज खानला जन्मठेप, तर अल्पवयीन गुन्हेगारास बालसुधारगृहात पाठविण्यात आले. खरंतर हे दोघेही या तिघांइतकेच दोषी. कारण, मुलींचे भावविश्व कोमल असते, मग ती श्रीमंत घरची मुलगी असो वा दरिद्री घरची असो; ती मुलगी तिच्या आईबाबांची लाडकी असते. त्या निष्पाप मुलीने मनात कित्येक स्वप्ने रंगवलेली असतात. आयुष्याच्या पटलावर भविष्य घडवण्याची स्वप्ने... पण, बलात्कार करणाऱ्या नराधमांमुळे पीडित मुलीच्या आयुष्याच्या आणि भावविश्वाच्या अक्षरशः चिंधड्या चिंधड्या होतात. तिची काहीही चूक नसताना तिला आयुष्यभर नरकयातना भोगाव्या लागतात. खरे म्हणजे जिवंत असूनही तिला मृतप्राय जगणेच जगावे लागते, एकवेळ हत्या केल्यावर माणूस मरतो आणि इहवादाने त्याचे सगळे सगळे संपते. मात्र, बलात्कारित मुलीचे, महिलांचे जगणे म्हणजे... त्यांच्यासाठी मरणप्राय आठवणींची कधीही न संपणारी वेदनादायी जखम असते. अश्वत्थाम्याच्या भळभळणाऱ्या जखमेपेक्षाही तीव्र आणि ताजी. या पार्श्वभूमीवर या तिघा नराधमांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली, याबद्दल खरोखरच धन्यवाद!

 

प्रकाश आणि तारे जमीन पर

 

आगामी विधानसभा निवडणूक ही राज ठाकरेंसाठी सुवर्णसंधी आहे, असे मत वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. हे तेच आंबेडकर ज्यांना २०१९च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अकोला आणि सोलापूर येथून पराभव पत्करावा लागला. त्यांनी हे ज्ञान राज ठाकरेंबाबत पाजळले आहे. नेहमी वाटत असते की, राहुल गांधी, राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर हे कोणत्या ना कोणत्या सूत्राने बांधलेले आहेत. खूप विचार केल्यावर कळले की, ते सूत्र आहे, ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाणकिंवा बाजारात तुरी आणि नवरा बायकोला मारीवगैरे वगैरे या ज्या म्हणी आहेत, या म्हणींनी तिघांना एका सूत्रात बांधले आहे. प्रकाश यांनी राज ठाकरेंना सल्ला देऊन यावर शिक्कामोर्तबच केले आहे. कारण, लोकसभेचा रंग अजून उतरला नाही, तर यांना विधानसभेची भांग चढली आहे. वंचित बहुजन आघाडीतील आंबेडकरांच्या भारिपला एकही जागा जिंकता आली नाही, सोलापूर तर सोडाच आपल्या हक्काच्या अकोला क्षेत्रामध्येही ते निवडून आले नाही. यावर प्रकाश यांना काही प्रकाश टाकायचा नाही. मात्र, राज ठाकरेेंना विधानसभा निवडणूक ही सुवर्णसंधी आहे, असे त्यांना वाटते. का? तर त्यांच्या मते, शिवसेना आणि मनसेचे उमेदवार एकाच मानसिकतेचे आहेत. शिवसेना जिथे उमेदवार उभी करणार नाही (याचाच अर्थ जिथे भाजप मित्रपक्ष लढेल) तिथे मनसेने आपले उमेदवार उभे करावेत. मग शिवसेनेची मते पण मनसेला मिळतील. काय हा तर्क? काय, तो युक्तिवाद? ‘असे झाले तर तसे होईल आणि तसे झाले तर असे होईल,’0 असे सुतावरून स्वर्ग गाठण्याचे अजब कौशल्य प्रकाश आंबेडकरांकडे आहे, तर इथे राज ठाकरे यांना सगळं अनाकलनीयवाटतं. राहुल गांधी यांना सगळं अविश्वसनीयवाटतं. मात्र, प्रकाश यांना राजसाठी सुवर्णसंधी वाटते. त्यांचे हे असे वाटणे पाहून लोकसभा निवडणुकीपूर्वीचा काँग्रेस-राष्ट्रवादीचा राजबद्दलचा विश्वास आठवला. त्याचे काय झाले हे सर्वांनी पाहिले. आता प्रकाश पुन्हा राजला सुवर्णसंधीचे गाजर दाखवत आहेत. आता इथे, ‘हुरळली मेंढी लागली कोल्ह्याच्या पाठीही म्हण लागू पडेल का? इतकी घाई नकोच. या म्हणींना जरा दूर ठेवूया. प्रकाश, राज, राहुल आणि काँग्रेस मित्रपक्ष मिळून येत्या निवडणुकीमध्ये या म्हणींपेक्षा रंजक असा तारे जमीन परचा शो करणार आहेत. तो शो म्हणींपेक्षा रंजक असेल.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat 
@@AUTHORINFO_V1@@