'सुपर ३०' चा ट्रेलर आज प्रदर्शित होणार

    04-Jun-2019
Total Views |

 
 

गणिततज्ञ आनंद कुमार आणि त्याच्या विद्यार्थ्यांवरून प्रेरणा घेऊन विकास बहल आणि अनुराग कश्यप दिग्दर्शित 'सुपर ३०' या चित्रपटाचा ट्रेलर आज दुपारी १ वाजता प्रदर्शित होईल. या चित्रपटामध्ये आनंद कुमार यांचा जीवनप्रवास प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हृतिक रोशन या चित्रपटात आनंद कुमार यांची भूमिका साकारणार आहे.

हृतिक रोशनसह पंकज त्रिपाठी, मृणाल ठाकुर, नंदिश सिंह, अमित साध आणि जॉनी लिवर असे कलाकार महत्वाच्या भूमिकांमध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या चित्रपटाची कथा फरहाद शामजी यांनी लिहिली आहे. या आधी हृतिक रोशनच्या अग्निपथ या चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शन केलेल्या अजय-अतुल यांनी या चित्रपटासाठी देखील संगीत दिग्दर्शन केले असून चित्रपट येत्या १२ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

आनंद कुमार यांनी बिहार मधील पटना येथे २००२ साली 'सुपर ३०' नावाच्या एका उपक्रमाला सुरुवात केली. या उपक्रमामध्ये शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांना संगणकीय क्षेत्रात सर्वात प्रतिस्थिती समजल्या जाणाऱ्या आय.आय.टी. परीक्षेसाठी तयार करण्याचा ध्यास घेतला आणि ते यामध्ये यशस्वी देखील झाले. त्यांच्या या संघर्षाची डिस्कव्हरी सारख्या मोठ्या मोठ्या चॅनल्सनी दाखल घेतली. आणि आता त्यांच्या या संघर्षाचे दर्शन आपल्याला 'सुपर ३०' या चित्रपमधून होणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat