
विकास बेहेल दिग्दर्शित 'सुपर ३०' चित्रपटाचे नवीन पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. या पोस्टरमध्ये काही लहान मुले पाण्यात भिजताना दिसत आहेत. तर या चित्रपटातील मुख्य भूमिका साकारणारा हृतिक रोशन पोस्टरमध्ये या मुलांमध्ये मजा करताना दिसतोय. या चित्रपटाचे नवीन पोस्टर "मिसाल बनो" असे म्हणत हृतिकने सोशल मीडियावर शेअर केले आहे. तर चित्रपटाचा ट्रेलर उद्या प्रेक्षकांच्या भेटीस येईल.
ह्रितिक रोशन गेले काही दिवस बऱ्याच वेळा वादाच्या भवऱ्यात अडकला होता. मात्र आता त्याचे आणि कंगना मधील वाद शमलेले दिसत आहेत. दरम्यान हृतिक रोशन याचा काबील या चित्रपटानंतर तो पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर बऱ्याच दिवसांनी दिसणार आहे. 'सुपर ३०' या चित्रपटामध्ये तो आणि त्याचे हे छोटे मित्र मजा करतानाच अभ्यास देखील करणार आहेत असे पोस्टरवरून लक्षात येते.
'सुपर ३०' या चित्रपटात हृतिक रोशन बरोबरच पंकज त्रिपाठी, मृणाल ठाकुर, नंदिश सिंह, अमित साध आणि जॉनी लिवर असे कलाकार महत्वाच्या भूमिकांमध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या नवीन पोस्टर बरोबरच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर करण्यात आली असून येत्या १२ जुलै ला हा चित्रपट प्रदर्शित होईल.
Misaal bano. Haqdaar bano. #Super30Trailer coming on June 4.@mrunal0801 @nandishsandhu @TheAmitSadh @TripathiiPankaj @teacheranand @Shibasishsarkar #SajidNadiadwala @RelianceEnt @NGEMovies @PicturesPVR @super30film @ZeeMusicCompany pic.twitter.com/md0CDuLz0c
— Hrithik Roshan (@iHrithik) June 3, 2019
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat