पुणे 'विहिंप'ची शोभायात्रा वादाच्या भोवऱ्यात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jun-2019
Total Views |


 

अध्यक्ष, जिल्हा कार्यध्यक्ष आणि जिल्हा मंत्र्यांसह २५० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल


पुणे : विश्व हिंदू परिषदेच्या वतीने रविवारी २ जून रोजी घेण्यात आलेली 'दुर्गा वाहिनी' या शौर्य प्रशिक्षण वर्गाची शोभायात्रा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. विनापरवाना शस्त्र बाळगल्याचा आरोप करत विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्ष, जिल्हा कार्यध्यक्ष आणि जिल्हा मंत्र्यांसह २५० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शिवाय ही शोभा यात्रा विनापरवाना काढण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला.

 

पिंपरी चिंचवडच्या निगडी पोलीस स्थानकात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, रविवारी रात्री पुण्यातील निगडीमध्ये अंकुश चौक ते ठाकरे मैदानादरम्यान ही शोभायात्रा काढण्यात आली होती. यावेळी चार ते पाच मुलींच्या हातात एअर रायफल व काही मुलींच्या हातात तलवारी आढळून आल्या होत्या. तसेच या एअर रायफलमधून फायर करण्यात आल्याचेही या तक्रारीमध्ये म्हटले आहे.

 

दरम्यान, विहिंपचे शरद इनामदार, धनाजी शिंदे आणि नितीन वाटकर यांच्यासह २५० कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat


@@AUTHORINFO_V1@@