कोंढवा दुर्घटनेच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jun-2019
Total Views |

                                                                                        

 
पुणे : कोंढवा येथे इमारतीची संरक्षक भिंत मजुरांच्या झोपड्यांवर कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. यात १६ मजुरांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेची गंभीर दाखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
 

मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत पुण्यातील कोंढवा इथे घडलेली दुर्घटना प्रचंड दु:खदायक आहे. या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या प्रती मी संवेदना व्यक्त करत असून दुर्घटनेत जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी मी प्रार्थना करीत आहे',असे म्हटले.

 

 

काम थांबविण्याचे आदेश

मध्यरात्री दीड वाजता इमारतीची संरक्षण भिंत कोसळून १७ मजूर जागीच ठार झाले होते. त्यामुळे या इमारतीच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आज सकाळी महापौर मुक्ता टिळक यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. महापौरांनी मजुरांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करत जखमींची विचारपूसही केली. त्यानंतर त्यांनी बिल्डराला काम थांबविण्याचे आदेश दिले. तसेच याप्रकरणाची चौकशी करण्यात येणार असून त्यात पालिकेचे अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

 
 
 
 
 माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat 
@@AUTHORINFO_V1@@