आंतरराष्ट्रीय स्तरावर संबंध दृढ करण्यात पंतप्रधान मोदींना यश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jun-2019
Total Views |


 


ओसाका : मोदी सरकारच्या कार्यकाळात देशांतर्गत समस्यांवर मात करण्यासह आंतरराष्ट्रीय संबंध सुधारण्यावर भर देण्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कल आहे. याचा थेट परिणाम म्हणजे जागतिक महासत्ता असलेले देश आता भारताला खुलेपणाने व्यापार आणि सामाजिक मुद्द्यांवर समर्थन करताना दिसत आहेत, त्याचाच प्रत्यय जपानच्या ओसाका येथे सुरू असलेल्या जी-ट्वेन्टी समिटमध्ये दिसून आला. आशियाई व्यापार प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विविध राष्ट्रांच्या प्रमुखांशी संवाद साधला. या परिषदेत त्यांनी इंडो-पॅसिफीक भागातील व्यापार स्थिर राहण्यासंदर्भातदेखील चर्चा यावेळी करण्यात आली.

 

नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल़्ड ट्रम्प यांच्याशी घेतलेल्या भेटीमुळे दोन्ही देशांतील व्यापारातील अडथळे दूर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय रशियाशी प्रस्तावित शस्त्रास्त्र कराराबद्दलही अमेरिकेला हरकत असणार नाही, असे स्पष्ट आहे. भारताशी चर्चा यापुढेही कायम राहणार असल्याचे मत ट्रम्प यांनी व्यक्त केले. भारत सरकारच्या कामगिरीबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, " भारत अमेरिकेशी सकारात्मक संबंध प्रस्थापित ठेवण्यास कटीबद्ध आहे. भारत-अमेरिका संबंध हे दोन्ही देशांच्या हिताचे आणि उज्ज्वल भविष्यासाठी कायम राहतील."

 

ओसाका येथील संमेलनादरम्यान संबोधित करताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले कि, "भारत-अमेरिका मैत्रीपूर्ण संबंध असले तरीही यापूर्वी एकत्रपणे येण्याचा योग आला नव्हता. मी ठामपणे सांगू शकतो कि, लष्कर आणि व्यापाराच्या मुद्द्यावर आम्ही पुन्हा संबंध प्रस्थापित करू. आम्ही लवकरच मोठ्या व्यापारविषयक घोषणा करू. त्यात उत्पादन, फाईव्ह जी, आदींचा सामावेश असेल." भारत अमेरिकेतील दृढ संबंधांबद्दल ट्रम्प यांनी मोदी आणि भारतीयांचे आभार मानले. भारताच्या उपलब्धींबद्दल त्यांनी अभिनंदन केले. आंतरराष्ट्रीय व्यापारात स्थिरता यावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

 

नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून-जे-इन यांची चर्चा

पंतप्रधानांनी दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून-जे-इन यांच्याशी व्यापार आणि गुंतवणूकीवर चर्चा केली. त्यासह पर्यटन, सांस्कृतीक संबंध, इंडो-पॅसिफीक भागातील व्यापाराच्या दृष्टीने दळणवळण व्यवस्था उभी करण्याच्या दृष्टीने चर्चा केली. भारत आणि दक्षिण कोरियातील व्हिसा प्रक्रीया संपूर्णपणे सुलभ करण्यावर भर देणार असल्याची चर्चा दोघांमध्ये झाली. व्यापाराच्या दृष्टीने उभय देशांतील संबंध आणखी दृढ होऊ शकतील, असे मत यावेळी मांडण्यात आले. त्यात दक्षिण कोरियातर्फे भारतातील उत्पादन क्षेत्रातील गुंतवणूक महत्वाची ठरणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

 

सौदी अरेबियाचे प्रिंस मोहम्मद बिन सलमान आणि मोदी यांची भेट

मोहम्मद बिन सलमान यांच्याशी भेट घेतल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी-भारतातील संबंध दृढ करण्याबद्दल चर्चा केली. उर्जा क्षेत्रासह अन्य क्षेत्रातील गुंतवणूक वाढ आणि दहशतवादाला आळा घालण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सकारात्मक चर्चेची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. सौदी अरेबियातील उर्जा क्षेत्रातील गुंतवणूक आणि त्यासाठी घेतलेल्या भूमिका, नेतृत्वाचे मोदींनी यावेळी कौतूक केले. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सौदी अरेबियाची भूमिका महत्वाची असल्याचे मत मोदींनी यावेळी व्यक्त केले. दहशतवाद मुळासकट उपटून टाकण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याच्या मुद्द्यावर यावेळी चर्चा झाली. प्रिंस यांनी यावेळी आंतरराष्ट्रीय परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले.

 

मोदी आणि ब्रिक्स नेत्यांशी चर्चा

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  यांनी जागतिक व्यापार संघटनेसमोर असलेल्या उर्जा, सुरक्षा, दहशतवाद आदी आव्हानांवर चर्चा केली. दहशतवादाविरोधात लढा देण्यासाठी एकत्र या, असे आवाहन मोदींनी यावेळी केले. दहशतवादी निरपराध नागरिकांना लक्ष्य करतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरून दहशतवादाचे समुळ उच्चाटन करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

 
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@