पत्रकार रणजीत जाधव यांना 'मुंबई स्टार रिपोर्टर' पुरस्कार प्रदान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jun-2019   
Total Views |


पर्यावरण पत्रकारितेत केलेल्या उत्कृष्ट कामागिरीबद्दल सन्मान

 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पर्यावरण पत्रकारितेमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पत्रकार रणजीत जाधव यांना 'मुंबई प्रेस कल्ब' तर्फे 'मुंबई स्टार रिपोर्टर'  पुरस्काराने शुक्रवारी गौरविण्यात आले. मुंबईतील 'नॅशनल सेंटर फाॅर दी परफॉर्मिंग आर्ट' (एनसीपीए) येथील सभागृहात शुक्रवारी सायंकाळी 'मुंबई प्रेस कल्ब' आयोजित 'रेड इंक' पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक डाॅ. प्रकाश आमटे यांच्या हस्ते जाधव यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सोहळ्याला पत्रकारिता क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित होती.

 

पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पत्रकारांना 'मुंबई प्रेस कल्ब' तर्फे दरवर्षी 'रेड इंक' पुरस्काराने गौरविण्यात येते. हे पुरस्कार विभागानुरुप देण्यात येतात. या पुरस्कारअंतर्गत मुंबईतील एका पत्रकाराला 'मुंबई स्टार रिर्पोटर' पुरस्काराने गौरिवण्यात येते. यंदाचा हा पुरस्कार पर्यावरण पत्रकार रणजीत जाधव यांना प्रदान करण्यात आला आहे. जाधव हे 'मिड-डे' या वृत्तपत्राचे वरिष्ठ पत्रकार आहेत. पर्यावरणाबरोबरच इंग्रजी भाषेतून वन्यजीव संवर्धन विषयाचे वार्तांकन करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. गेल्या वर्षभरात त्यांनी वन्यजीव संवर्धन विषयासंबंधीचे दर्जेदार वार्तांकन केले आहे. यवतमाळच्या 'अवनी' वाघीण प्रकरणाचे त्यांनी उत्कृष्टरित्या वृत्तांकन केले होते. शिवाय मुंबईतील आरे वसाहतीमधील 'मेट्रो-३' च्या कारशेडमुळे तेथील जैवविविधतेवर आणि बिबट्यांच्या अधिवासावर होणाऱ्या परिणामाचे त्यांचे वर्षभरातील वृत्तांकन वाखणण्याजोगे होते. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात गोरेगावच्या 'दादासाहेब फाळके चित्रनगरीत' घडलेल्या बिबट्या व सांबर शिकार प्रकारणाचे वृत्तांकन देखील त्यांनी लावून धरले. या सर्व वृत्तांकनाची दखल घेत 'मुंबई प्रेस कल्ब'ने त्यांचा 'मुंबई स्टार रिपोर्टर' पुरस्काराने गौरव केला आहे.

 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@