जी-२० शिखर परिषद : नरेंद्र मोदी-डोनाल्ड ट्रम्प यांची भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jun-2019
Total Views |



ओसाका : जपानमध्ये ओसाका येथे सुरू असलेल्या जी-२० शिखर परिषदेदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. या भेटीत नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात इराण, 5-G, दोन्ही देशांमधले चांगले संबंध आणि सुरक्षा विषयी संबध आदी महत्त्वाच्या चार मुद्द्यांवर चर्चा झाली.

 

यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदींचे लोकसभेत मिळवलेल्या अदभूतपूर्व यशाबद्दल अभिनंदन केले. २०१४ मध्ये लोकसभा निवडणूकीवेळी सर्वपक्षीय नेते एकमेकांविरोधात लढले होते. मात्र, २०१९ च्या निवडणूकीत मोदींविरोधात सर्व पक्षीय नेत्यांनी आघाडी केल्यानंतरही भाजपने घवघवीत यश मिळवले. हा विजय मोदी यांच्या क्षमतेचे उदाहरण आहे, अशा शब्दांत कौतुक केले.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले. भारत लोकशाही आणि शांततेसाठी कटीबद्ध असल्याचे मोदी म्हणाले. 'सबका साथ, सबका विकास हा आमचा मंत्र आहे. मेक इन इंडियाच्या माध्यमातून आम्ही पुढे जात आहोत,' असे मोदींनी ट्रम्प यांना सांगितले. तर गेल्या काही वर्षांमध्ये भारत आणि अमेरिकेचे संबंध सुधारल्याचेही ट्रम्प म्हणाले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@