तोट्यातील १९ सरकारी कंपन्या बंद होणार

    27-Jun-2019
Total Views |


नवी दिल्ली : तोट्यात असणाऱ्या १९ मोठ्या कंपन्या बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. लोकसभेमध्ये काँग्रेसचे खासदार अदूर प्रकाश यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांनी ही माहिती दिली. एचटीएम, हिंदुस्तान केबल्स आणि इंडियन ड्रग्स या कंपन्यांचा यामध्ये समावेश असणार आहे.

 

प्रकाश यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सावंत यांनी ही यादीच जाहीर केली. यामध्ये तुंगभद्रा स्टील प्रोडक्ट्स लिमिटेड, एचएमटी वॉचेस लिमिटेड, एचएमटी चिनार वॉचेस लिमिटेड, एचएमटी बेअरिंग्स लिमिटेड , हिंदुस्तान केबल्स लिमिटेड, एचएमटी लिमिटेडच्या मालकीचे टॅक्टर युनिट, इंन्स्टुमेंटेशन लिमिटेडचा कोट्टा येथील कारखाना, केंद्रीय अंतर्देशीय जल परिवहन निगम लिमिटेड, इंडियन ड्रग्स आणि राजस्थान ड्रग्स अॅण्ड फार्मास्युटिकल्स लिमिटेड, आयओसीएल क्रेडा बायोक्युएल लिमिटेड, क्रेडा एचपीसीएल बायोक्युएल्स लिमिटेड, अंदामन आणि निकोबार वन आणि वृक्षारोपण विकास निगम लिमिटेड, भारत वॅगन अॅण्ड इंजीनियरिंग कंपनी लिमिटेड, बर्न स्टॅण्डर्ड कंपनी लिमिटेड, सीएनए/एन टू ओ फोर प्लॅण्ट वगळता हिंदुस्तान ऑर्गेनिक केमिकल्स लिमिटेडच्या रसायन क्षेत्रातील सर्व कारखाने, ज्यूट मॅन्युफॅक्चर्स कॉर्पोरेशन लिमिटेड, बर्डस ज्यूट अॅण्ड एक्सपोर्ट लिमिटेड, एसटीसीएल लिमिटेड यांचा समावेश आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat