अभिमानास्पद ! भारतातील या खेड्यात महिला पुरुषांना मिळते समान वेतन

    26-Jun-2019
Total Views |



कोहीमा : समान वेतनाच्या मुद्द्यावर जगभरात रणकंदन माजले असताना भारतातील एका खेड्याने जगासमोर आदर्श निर्माण केला आहे. नुकतेच स्वित्झर्लंडमध्ये समान वेतनासंदर्भात महिलांनी प्रदर्शने केली होती. गेली ३० वर्षे ही लढाई सुरू आहे. मात्र, भारतात नागालॅंडस्थित शिजामी गावात महिलांनी तीस वर्षांपासून त्यांच्या अधिकाराबद्दल जागरूक आहेत. नागालॅंड येथील फेक जिल्ह्यात शिजामी गावातील महिलांनी सलग आठ वर्षे समान वेतनाच्या हक्कासाठी लढा दिला होता. यात संवेदनशील पुरूषांनी त्यांना साथ दिला.

 

शिजामी गावातील महिलांच्या मते, पुरूष गावातील शेतीची कामे अधिक मेहनतीने करत असल्याने त्यांना जास्त वेतन दिले जात होते. गावातील महिला अध्यक्ष केंजुन्यपी यू सूहा यांनी महिलांचा आवाज गावासमोर उठवला. आम्ही महिला जी कामे करू शकतो, ती पुरूषांना शक्य नाहीत. पुरूषांपेक्षा जास्तवेळ महिला शेतात राहून कामे करू शकतात. गावातील शेतीच्या कामात यंत्रसामुग्रीच्या मदतीविना महिला अधिक ताकदीने कामे करू शकतात. २००७ पासून हा लढा सुरू होता गावातील पुरुषांनीही आमचे म्हणणे मांडण्यासाठी आम्हाला मदत केली आहे.

 

लावणीसाठी ४५० रुपये आणि इतर कामांना ४०० रुपये मजूरी

शिजामी गावात कृषिक कामांसाठी समान मजूरी लागू आहे. या गावातील मजूरांना १ जून ते जुलैच्या मध्यापर्यंत ४५० रुपये प्रतिदिन मजूरी दिली जाते. हा काळ वगळता वर्षभर ४०० रुपये मजूरी दिली जाते. या गावात एकूण सहाशे घरे आहेत. एकूण लोकसंख्या असलेल्या ५ हजार वर्षांत ३० टक्के लोक शेतीत मजूरी करतात.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat