रुग्णवाहीकेला रस्ता न दिल्यास होणार इतका दंड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jun-2019
Total Views |



जाणून घ्या विनाहेल्मेट वाहन चालवण्यासाठी तरतूद काय

 

नवी दिल्ली : रस्ते वाहतूक सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारने सोमवारी सायंकाळी मोटार वाहन (संशोधन) विधेयकाला मंजूरी दिली. लवकरच हे विधेयक संसदेत आणले जाणार आहे, नव्या संशोधन विधेयकानुसार, रुग्णवाहीका, अग्निशमन बंब आदी आपत्कालीन वाहनांना रस्ता न दिल्यास दहा हजारांचा दंड ठोठावण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. याशिवाय अन्य कायदेही कडक करण्याबाबत यावेळी चर्चा झाली व त्याचे उल्लंघन करण्यात येणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

 

ओला-उबरसारख्या कंपन्यांमधील समुह वाहन परवान्याचे उल्लंघन केल्यास १ लाखांपर्यंत दंड आकारला जाणार आहे. वाहन नियोजित मापदंडांपेक्षा जास्त वेगाने चालवल्यास दोन हजारांपर्यंत दंड, वाहनविम्या व्यतिरीक्त वाहन चालवणाऱ्यांना दोन हजारांपर्यंत दंड आकारण्यात येईल, विना हेल्मेट वाहन चालवणाऱ्यांना एक हजारांचा दंड तर तीन महिन्यांपर्यंत परवाना रद्द करण्याची तरतूद यात करण्यात आली आहे.

 

अठरा वर्षाखालील मुले वाहन चालवताना आढळल्यास वाहनमालकाला दोषी ठरवत वाहनाची नोंदणी रद्द करण्यात येईल. तीन वर्षे कैद आणि २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला जाऊ शकतो. किरकोळ वाहननियम उल्लंघन प्रकरणात किमान शंभर ते पाचशे रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे. विना परवाना वाहन चालवणाऱ्यांसाठी पाच हजार रुपये दंड आकारला जाईल. १६ व्या लोकसभेच्या अखेरच्या दिवसानंतर हे विधेयक बारगळले होते. नव्या सरकारने आता पुन्हा यावर चर्चेचा प्रस्ताव ठेवला आहे. हे विधेयक पारित झाल्यानंतर रस्ते वाहतूक सुरक्षेची नवी नियमावली लागू करण्यात येणार आहे. 

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@