बँक तक्रारींचे अ‍ॅपद्वारे होणार निवारण

    25-Jun-2019
Total Views |



नवी दिल्ली : ग्राहकांच्या बँकेविषयी तक्रारी निवारणासाठी 'आरबीआय' लवकरच एक कम्प्लेंट मॅनेजमेंट सिस्टम म्हणजेच सीएमएस लॉन्च करणार आहे. ई-मेल, लिखित पत्रे, सोशल मीडिया यांसारख्या माध्यमांतून केलेल्या तक्रारींवर आरबीआय'नजर ठेवणार आहेत. 'आरबीआय' या तक्रारी संबंधित बँका आणि इतर संबंधित संस्थांना पाठणार आहेत.

 

'सीएमएस' मध्ये नोंदविलेली तक्रार ग्राहकांना ऑनलाईन ट्रॅक करता येणार आहे. सध्या तरी बँकांशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी तीन बँकिंग ओम्बुडसमॅन (लोकपाल) ची व्यवस्था आहे. याशिवाय तक्रार यंत्रणाही पूर्णपणे ऑनलाईन नाही. आरबीआयच्या या नव्या व्यवस्थेमुळे ग्राहकांना घरबसल्या आपल्या बँकांच्या तक्रारी सोडवता येणार आहे.

  

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat