डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बलात्काराचे आरोप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jun-2019
Total Views |



न्यूयॉर्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप न्यूयॉर्कमधील एका लेखिकेने केला आहे. ही लेखिका महिलांच्या समस्यांसंबंधी स्तंभलेखन करते. दोन दशकापूर्वी ट्रम्प यांनी बलात्कार केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. महिलेचा आरोप फेटाळून लावत ही बातमी बनावट असल्याचे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

 

न्यूयॉर्कमधील ७५ वर्षीय ई. जीन कॅरोल यांच्या व्हॉट डू वूई नीड मेन फॉर? या पुस्तकात त्यांनी हा आरोप केला आहे. ट्रम्प यांनी १९९०च्या दशकात न्यूयॉर्क सिटीच्या एका डिपार्टमेंटल स्टोअरच्या खोलीत आपल्यावर लैंगिक अत्याचार केला होता, असा आरोप या पुस्तकात त्यांनी केला आहे. या पुस्तकातील महत्त्वाचे अंश न्यूयॉर्क मॅगझीनच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आले आहेत. ट्रम्प यांच्यासह अनेक पुरुषांनी आपले लैंगिक शोषण केल्याचा दावासुद्धा त्यांनी या पुस्तकात केला आहे.

 

दरम्यान, कॅरोल यांनी केलेला आरोप ट्रम्प यांनी फेटाळून लावला आहे. मी कॅरोल यांना कधीच भेटलो नाही. पुस्तक खपवण्यासाठी लेखिकेचा हा डाव आहे, असे त्यांनी म्हटले आहे. पुस्तकाची विक्री व्हावी यासाठी प्रसिद्धीचा बनाव करणार्‍या लोकांना लाज वाटायला हवी, असा संतापही ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@