योगशास्‍त्र हे भारतीय संस्‍कृती, इतिहास व वारसा यांचे प्रतीक - नितीन गडकरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jun-2019
Total Views |



 

नागपूर : 'पूर्ण विश्‍वात आंतरराष्‍ट्रीय योग दिवस उत्‍साहाने साजरा होतो आहे. भारतीय संस्‍कृती, इतिहास व वारसा यांचे प्रतीक योगशास्‍त्र आहे व जगामध्‍ये याला मान्‍यता मिळाली आहे, ही भारतीयांसाठी अभिमानास्‍पद बाब आहे',असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व जहाजबांधणी आणि केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर येथे केले. यशवंत स्‍टेडियम येथे नागपूर महानगर पालिका व केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांच्या नेहरू युवा केंद्र संघटन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विश्‍व योग दिवसाच्‍या निमित्‍ताने आयोजित कार्यक्रमाच्‍या प्रमुख अतिथींच्या स्‍थानी ते बोलत होते.

 

दैनंदिन योग अभ्‍यासामूळे स्‍वास्थ चांगले राहते. नागपूरच्‍या कार्यक्रमामध्‍ये सहभागी झालेल्‍या योगसाधकांनी योग अभ्‍यासाचा अवलंब करावा व आपले जीवन स्‍वस्‍थ्‍य व निरोगी ठेवण्‍यात यशस्‍वी व्‍हावे, असे आवाहन गडकरी यांनी यावेळी केले. या योगप्रसाराच्‍या कार्यात जनार्दन स्‍वामी योगाभ्‍यासी मंडळ व इतर योग प्रेमी संस्‍थाचे कार्य प्रशंसनीय आहे, असेही त्‍यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी विविध संस्‍थाकडून योगासनांची प्रात्‍याक्षिक करून दा‍खविण्‍यात आली. या कार्यक्रमास नागपूरातील योगसाधक, नागरिक, शालेय विद्यार्थी बहुसंख्‍येने उपस्थिति होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@