योग हे नव्या युगाचे उभरते करिअर : डॉ. अमित मिश्रा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jun-2019
Total Views |


 


ठाणे : संपूर्ण जगाला योग संस्कृतीतून जोडण्याचा प्रयत्न आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. जगातील २०० देशांमध्ये आता योगाला गांभीर्याने घेतले जात आहे. या पार्श्वभूमीवर योग हे एक नवे करिअर म्हणून समोर येत आहे. त्यासाठी जगालाही योगशिक्षकांची गरज भासणार आहे. तेव्हा दर्जेदार योगशिक्षक देण्याची जबाबदारी भारताची आहे,” असे प्रतिपादन डॉ. अमित मिश्रा यांनी व्यक्त केले. दै. मुंबई तरुण भारत’, एस-व्यासा योग विद्यापीठ, विवेकानंद स्टडी सेंटर, विवेकानंद केंद्र व जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्यावतीने करिअर आणि योगातील भविष्यातील संधीया विषयावर डॉ. अमित मिश्रा यांच्या व्याख्यानाचे आयोजन जोशी-बेडेकर महाविद्यालयात करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

 

ते पुढे म्हणाले की, “अनेक वर्षे योग हा फक्त स्वत:साठी मर्यादित विषय मानला जात होता. मात्र, स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्थानच्या ४० वर्षांच्या योगविषयावरील सात्यत्यपूर्ण संशोधनातून योगहा केवळ व्यक्तिगत विषय न राहता, त्याला असलेले अनेक वैज्ञानिक पदर जगासमोर आणण्यात आले आहेत. अनेक डॉक्टर आता योगाला उपचारासोबत पॅरामेडिकलपर्याय म्हणून स्वीकारत आहेत. संपूर्ण जगात योगाचा प्रचार आणि प्रसार लक्षात घेता, करोडो दर्जेदार योगशिक्षकांची गरज भासणार आहे.या पार्श्वभूमीवर योग हे उभरते करिअर म्हणून समोर येत असून, त्याचा फायदा नव्या पिढीने घेण्याची गरज असल्याचे डॉ. अमित मिश्रा यांनी यावेळी बोलताना सांगितले.

 

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगाला योगसंस्कृतीशी जोडण्याचा प्रयत्न केला. भारतीय प्राचीन योगसाधनेचे महत्त्व एकीकडे जगाला कळत असताना या साधनेचे तंत्रशुद्ध शिक्षण देणारी व्यवस्था भारताने उभी करायला हवी. जगाला योग शिकविण्यासाठी करोडे योगशिक्षक लागणार असून त्यासाठी जग भारताकडे पाहात आहे. स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्थानया विषयात काम करीत असून महिन्याला एक लाख योगशिक्षक तयार करण्याची तयारी केंद्र करीत आहे. त्यासाठी दुरस्थ योग शिक्षण कोर्सदेखील केंद्राने तयार केला आहे. हे करताना जगातील तीसहून अधिक विद्यापीठांशी केंद्राने करार केला आहे. केंद्राच्या या कोर्सच्या माध्यमातून प्रशिक्षित योगशिक्षकांना परदेशातील शाळा, महाविद्यालयांसह विविध ठिकाणी योगशिक्षक म्हणून आपले करिअर उभे करता येणे आता शक्य झाले आहे,” असे डॉ. मिश्रा यांनी यावेळी बोलताना सांगितले.

 

दै. मुंबई तरुण भारतसारखे वर्तमानपत्र योगशिक्षणाच्या प्रचार आणि प्रसारासाठी जे योगदान देत आहे, ते अत्यंत आवश्यक असून महाविद्यालये ही योग प्रसाराची केंद्रबिंदू झाली पाहिजेत,” अशी गरजदेखील डॉ. मिश्रा यांनी व्यक्त केली. डॉ. इंद्रायणी रॉय यांनी या कार्यक्रमामागील महाविद्यालयाची, तर दै. मुंबई तरुण भारतचे व्यवसाय प्रतिनिधी आनंद वैद्य यांनी दै. मुंबई तरुण भारतची भूमिका यावेळी उपस्थितांसमोर मांडली. प्रा. संतोष राणे यांनी वक्त्यांचा परिचय, तर प्रा. तृप्ती कौटीकवार यांनी आभारप्रदर्शन केले. यावेळी एनएसएस, एनसीसी, विवेकानंद केंद्र व इतर महाविद्यालयीन विद्यार्थी आवर्जून उपस्थित होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@