पंतप्रधान मोदींमुळेच जगाला योगाची ओळख

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jun-2019
Total Views |



 


मुख्यमंत्री फडणवीस यांनी नांदेड येथील योगशिबिरात व्यक्त केली भावना


नांदेड : देशभरासह आज महाराष्ट्रातही पाचवा आंतराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नांदेडमधील शिवरत्न जिवाजी महाले चौकात भव्यदिव्य योगशिबिराचे आयोजन करण्यात होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि योगगुरु रामदेव बाबा यांनी या योगशिबिरामध्ये भाग घेतला. यावेळी तब्बल दीड लाख नागरिक उपस्थित असल्याचे सांगितले जात असून या योग कार्यक्रमाची गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली.

 

आज जगातील दीडशे देशात योग दिन साजरा केला जातो, संयुक्त राष्ट्रामध्ये योगास मान्यता मिळवून देण्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मोठे योगदान आहे, तर योगाचा प्रसार- प्रचार करण्यात योगगुरू रामदेव बाबा यांचे मोठे योगदान असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. तर रामदेव बाबा यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत, योग हा आपल्या आयुष्यात मोलाचा वाटा उचलणारा भाग असून आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करतो, अशी भावना व्यक्त केली.

 

गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

 

एकाचवेळी एकाच ठिकाणी ९१ हजार ३२३ लोकांनी योगासने करण्याचा पूर्वीचा जागतिक विक्रम नांदेड येथील आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनादिवशी मोडला जाऊन नांदेडच्या पावनभूमीत एक लाख १० हजारापेक्षा अधिक लोकांना एकाचवेळी एकाच ठिकाणी रामदेवबाबा यांनी योग विद्येचे प्रशिक्षण दिले व नवीन जागतिक विक्रमाला नांदेडकरांनी गवसणी घातली. यावेळी गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डचे प्रतिनिधी मनीष विष्णूई यांनी ड्रोनद्वारे प्राथमिक गणनेनुसार नांदेड येथील योग कार्यक्रमास एक लाख १० हजारापेक्षा अधिक लोक असल्याची माहिती दिली. जागतिक विक्रम नांदेडकरांनी प्रस्थापित केल्याचे गोल्डन बुक प्रमाणपत्र विष्णुई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रामदेवबाबा यांना यावेळी दिले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@